वोडाफोन-आयडिया करतेय 5G ची तयारी, वाचा सविस्तर
Vodafone Idea teams up with Larsen & Toubro for trials of 5G-based smart city solutions
टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडिया (व्हीआयएल), स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन बिझिनेस ऑफ इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन ग्रुप लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) ह्या कंपन्या 5G आधारित स्मार्ट सिटी सोल्यूशन्सची चाचणी घेण्यासाठी, पायलट प्रोजेक्टकरिता एकत्र येत आहे.
सरकारद्वारे वाटप केलेल्या स्पेक्ट्रमवर चालू असलेल्या 5G चाचण्यांचा हा एक भाग असेल.
संयुक्त निवेदनात एकत्र सहकार्याची घोषणा करताना कंपन्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी व्हिज्युअलायझेशन आणि विश्लेषण करण्यासाठी सरकारकडून 5 जी स्पेक्ट्रमवर पायलट प्रोजेक्ट उभारला जाईल.
कंपन्या इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), व्हिडिओ AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणीसाठी सहयोग करतील.
व्होडाफोन आयडियाचे मुख्य एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर अभिजित किशोर म्हणाले, टेलिकॉम सोल्यूशन्स हा स्मार्ट आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीचा कणा आहे.
किशोर पुढे म्हणाले, “5G तंत्रज्ञानाच्या आगमनाने एकूण वाढीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि भविष्यात स्मार्ट सिटीच्या शाश्वत निर्मितीस समर्थन देण्यासाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान केले जाईल.”
VIL ला त्यांच्या 5G नेटवर्क चाचण्या आणि वापर प्रकरणांसाठी टेलिकॉम विभागाने mmWave बँडमध्ये 26 GHz आणि 3.5 GHz स्पेक्ट्रम वाटप केले आहे.
टेलिकॉम कंपनीने आपल्या OEM पार्टनरसह 3.5 Ghz बँड 5G ट्रायल नेटवर्कमध्ये 1.5 Gbps पर्यंत डाउनलोड स्पीड नोंदवली.
Comments are closed.