रिलायन्स काही थांबेना! आणखी एका कंपनीत उचलला ५२% स्टेक

Reliance Retail has picked up majority stake in fashion brand Ritu Kumar

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने 19 ऑक्टोबर रोजी जाहीर केले की, त्यांनी रितिका प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 52 टक्के इक्विटी स्टेक विकत घेतला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने खाजगी इक्विटी फर्म एव्हरस्टोन ग्रुपचा सदर कंपनीतील 35 टक्के स्टेक विकत घेऊन करार पूर्ण केला. रितिका प्रायव्हेट लिमिटेडकडे रितू कुमार, आरआय रितू कुमार, आरके, रितू कुमार होम अँड लिव्हिंग या ब्रॅण्ड्सची मालकी आहे.

रिलायन्स ब्रॅण्ड्सने गेल्या आठवड्यात क्रिएटिव्ह डायरेक्टर मनीष मल्होत्रा ​​यांच्या नावाजलेल्या ब्रँडमध्ये 40 टक्के स्टेक विकत घेतले होते.

रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “भारतामध्ये आढळणाऱ्या कापडावरील तसेच विणकामांच्या छपाई आणि पेंटिंगमधील डिझाईनची कौशल्ये फारच कमी देशात आढळतात. फॅशन विश्वात स्वतःची अशी ओळख असणाऱ्या, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याची क्षमता आणि फॅशन तसेच रिटेलमध्ये नाव कमावलेल्या रितु कुमार यांच्याशी पार्टनरशिप करताना आम्हाला आनंद होत आहे. यातून आम्ही एक मजबूत व्यासपीठ आणि ग्राहक इकोसिस्टम तयार करू इच्छितो.

दरम्यान, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने यावर्षी जानेवारी महिन्यात सब्यसाची डिझायनर लेबलमध्ये मेजॉरिटी स्टेक घेतला होता. फेब्रुवारीमध्ये त्यांनी डिझायनर तरुण ताहिलियानीमध्ये 33 टक्के स्टेक विकत घेतला .

बाजाराच्या अंदाजानुसार,पुरुष आणि स्त्रियांच्या इथनिक बाजारपेठेचे मूल्य सुमारे 1.5 लाख कोटी रुपये आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात 88 टक्के इथनिक वेअर मार्केट असंघटित आहे. त्यामुळे संघटित बाजाराचे मूल्य 17,000-18,000 कोटी आहे. संघटित विभागात, सुमारे 40 टक्के बाजार मूल्य ब्रँडचे आहे, 30 टक्के प्रीमियम ब्रँडचे आणि 30 टक्के लक्झरी ब्रँडचे आहेत.

Comments are closed.