CMS Info Systems IPO साठी आज होऊ शकते शेअर वाटप, वाचा ग्रे मार्केट मध्ये काय आहे परिस्थिती
भारतातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी, CMS Info Systems, 2021 मध्ये IPO लाँच करणारी 65 वी आणि शेवटची कंपनी बनल्यानंतर,आज ती शेअर वाटप निश्चित करु शकते.
भारतातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी, CMS Info Systems, 2021 मध्ये IPO लाँच करणारी 65 वी आणि शेवटची कंपनी बनल्यानंतर,आज ती शेअर वाटप निश्चित करु शकते.
कंपनीच्या पब्लिक इश्यूला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 21-23 डिसेंबर दरम्यान 1.95 पट सबस्क्रिप्शन घेतले गेले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी वाटप केलेल्या कोट्याच्या 1.98 पट शेअर्ससाठी बोली लावली.
रिटेल गुंतवणूकदारांनी 2.15 पट बोली लावली होती आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारानी 1.45 पट बोली लागली होती.
BSE किंवा IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर वाटप स्थिती कशी तपासायची ते पाहा?
BSE वेबसाइटवर वाटप स्थिती तपासताना, गुंतवणूकदारांनी या तीन सोप्या स्टेपचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
1)इक्विटी आणि इश्यू नाव निवडा. ( CMS Info Systems Ltd )
2)अर्ज क्रमांक आणि पॅन क्रमांक टाका.
3)चेक बॉक्स (मी रोबोट नाही) आणि शेवटी सर्च बटणावर क्लिक करा.
IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर, या स्टेपचे अनुसरण करा.
1) कंपनीचे नाव निवडा. (CMS Info Systems Limited – IPO)
2)पॅन क्रमांक, किंवा अर्ज क्रमांक किंवा DP क्लायंट आयडी टाका.
3)वाटपाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेवटी शोध बटणावर क्लिक करा.
कंपनीने पब्लिक इश्यूद्वारे 1,100 कोटी रुपये उभे केले आहेत. जे पूर्णपणे प्रमोटीने विक्रीसाठी ऑफर केले होते.
ग्रे मार्केटमध्येही, CMS Info Systems चे शेअर्स फक्त 5 रू. च्या प्रीमियमने ट्रेडिंग करत आहेत, IPO Watch च्या डेटानुसार, जे 216 च्या इश्यू किंमतीपेक्षा सुमारे 2.5 टक्के जास्त आहे.
अयशस्वी बोलीदारांना 29 डिसेंबरपर्यंत परतावा मिळेल, तर यशस्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत शेअर्स मिळतील.
31 डिसेंबर रोजी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर स्टॉकची लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.