सीएनजीचा भडका! किलोमागे 2.28 रुपयांनी वाढले दर

CNG price hiked in Delhi-NCR after Centre raises gas rate by 62%

दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 2.28 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने 1 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली आहे.

2 ऑक्टोबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत सीएनजीची किंमत प्रति किलो 47.48 रुपये असेल, असे आयजीएलने सांगितले. दरम्यान केंद्राने डोमेस्टिक नॅचरल गॅसच्या किंमतीत 62% वाढ नोंदवल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली.

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये, दर वाढवून 53.45 रुपये प्रति किलो केले आहेत, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 2.55 रुपयांनी वाढले आहेत.

IGL ने जारी केलेल्या शहरनिहाय किंमतीनुसार, सीएनजी वर दर खालीलप्रमाणे आकारले जातील.

गुरुग्राम 55.81 रुपये प्रति किलो
रेवाडी 56.50 रुपये प्रति किलो
कर्नाल आणि कैथल 54.70 रुपये प्रति किलो
मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली 60.71 रुपये प्रति किलो
कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये 63.97 रुपये प्रति किलो
अजमेर 62.41 रुपये प्रति किलो

सीएनजी व्यतिरिक्त, पीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये पीएनजीचा दर 2.10 रुपये प्रति क्यूबिक मीटरने वाढवून 33.01 रुपये प्रति एससीएम करण्यात आला आहे, तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजी गॅसची किंमत 32.86 रुपये प्रति एससीएम असेल.

30 सप्टेंबर रोजी PPAC यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की,1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान देशांतर्गत उत्पादित नॅचरल गॅसची किंमत 2.90 डॉलर mmBtu असेल.

यामुळे विद्यमान गॅस किंमतीत 62 टक्के वाढ झाली, जी 1.79 डॉलर mmBtu होती.

नॅचरल गॅस हा कच्चा माल आहे जो सीएनजीमध्ये ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून वापरला जातो.

नॅचरल गॅसच्या किमती ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ऑईल इंडिया लिमिटेड सारख्या सरकारी उत्पादकांच्या कमाईवर परिणाम करतात.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सप्टेंबरमध्ये आपल्या अहवालात म्हटले होते की, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ऑक्टोबरपासून 10-11 टक्क्यांनी वाढू शकतात, याचे कारण सरकारने ठरवलेल्या गॅसच्या किमतीत सुमारे 76 टक्के वाढ होणार आहे.

Comments are closed.