अबब! एका रात्रीसाठी तब्बल ‘इतकं’ भाड, ड्रग प्रकरणामुळे चर्चेस आल क्रूझ

Cruise one night price details

गेल्या वर्षभरापासून बॉलीवूड इंडस्ट्रीला ड्रग्स प्रकरणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याअगोदर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स प्रकरणामुळे अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित ड्रगचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. याचेच ताजे उदाहरण म्हणजे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, ज्याला एनसीबीने अटक केली आहे.

आर्यन खान स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. दरम्यान क्रूझ पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन केल्याबद्दल एनसीबीने त्याला अटक केली आहे. सध्या एनसीबीने त्याला एक दिवसाच्या कोठडीत ठेवले आहे.

आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे.आर्यन खान ज्या क्रूझमध्ये पार्टी करत होता ते काही साधे जहाज नव्हते, त्यात अनेक सुविधा उपलब्ध होत्या.एकंदरीतच ते अत्यंत महागडे आहे.

ही क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. तीचे नाव कॉर्डेलीया क्रूझ आहे. क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बरेच लोक याचा लाभ घेतात.

या क्रूझमध्ये तुम्हाला फूड पॅव्हेलियन उपलब्ध असते. 3 स्पेशल रेस्टॉरंट्स आणि 4 बार आहेत. क्रूझमध्ये फिटनेस सेंटरही आहे. स्पा आणि सलून देखीलआहेत. एक कॅसिनो आणि एक थिएटर देखील त्यात आहे. तेथे स्विमिंग पूल देखील आहे. त्यात नाईट क्लब, बँड आणि डीजे देखील उपलब्ध आहे. येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे.

क्रूजच्या आत कॅसिनो देखील खूप जबरदस्त आहे. तेथे कॅसिनो बार देखील उत्तम आहेत. आपण तेथे संगीताचा आनंद देखील घेऊ शकता.

कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज 17700 पासून सुरू होते. हा रेट एका रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज 53100 रुपये आहे. यामध्ये दोन लोक सहभागी होऊ शकतात. तसेच, दोन रात्रींसाठी हाई सी पॅकेज दोन व्यक्तीसाठी 35400 रुपये आहे.

कॉर्डेलिया क्रूझ 18 सप्टेंबर 2021 पासून भारतात सुरू झाली होती. पुढील वर्षापासून श्रीलंकेपर्यंत ही क्रूझ सेवा सुरू होणार आहे.

आर्यन खानबाबत बोलले तर, रविवारी त्याला एनसीबीने एक दिवसाच्या कोठडीत घेतले आहे. आर्यन खानने एनसीबीसमोर कबूल केले की त्याने पार्टीमध्ये ड्रग्ज घेतले होते.

Comments are closed.