15 ऑक्टोबरपासून येणार ॲपल वॉच सीरीज 7, असतील ‘हे’ फिचर्स

Apple Watch Series 7 price in India and availability have been officially announced.

ॲपल वॉच सीरिज 7 इंडियाच्या किंमतीचा तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. आयफोन 13 आणि आयफोन 13 प्रो सिरीजसोबत लाँच झालेले ॲपल वॉच हे डिस्प्ले आणि काही किरकोळ अपग्रेड सोबत उपलब्ध होईन. भारतात ॲपल वॉच सीरिज 7 ची किंमत 41,900 रुपयांपासून सुरू होते.

ॲपल वॉच सीरीज 7 ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

ॲपलने नुकतेच जाहीर केले आहे की, 15 ऑक्टोबरपासून ॲपल वॉच सीरिज 7 विक्रीसाठी उपलब्ध होईल. ग्राहक त्यांची ॲपल वॉच सीरीज 7 ची प्री-ऑर्डर 8 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 5.30 वाजता बूक करू शकतात. सदर ॲपल वॉच दोन स्क्रीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध होईन. बेस 41mm व्हेरिएंटची किंमत 41,900 रुपये आहे. यात ॲल्युमिनियम केस तसेच जीपीएस इनबिल्टसह उपलब्ध आहे. तर 45mm वेरिएंटची किंमत 44,900 रुपये आहे. ॲपल दोन्ही मॉडेल्सचे सेल्युलर व्हेरिएंट देखील लॉन्च करत आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 50,900 आणि 53,900 रुपये असेल.

ॲपल वॉच सीरीज 7 मिडनाईट, स्टारलाईट, ग्रीन आणि ब्ल्यू आणि रेड या रंगात उपलब्ध होइल.

ॲपल वॉचचे स्टेनलेस स्टील व्हर्जन जीपीएस+सेल्युलर व्हेरिएंटसाठी 69,900 रुपयांपासून सुरू होते. 45mm मॉडेलची किंमत 73,900 रुपये असेल. मिलनीज लूपसाठी जास्तीचे 4,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. ॲपल वॉच सीरिज 7 सिल्व्हर, ग्रेफाइट आणि गोल्ड स्टेनलेस स्टीलमध्ये उपलब्ध आहे.

ॲपल वॉच सीरीज 7 Apple.com/in/store वरून किंवा ॲपल संबंधीत अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करु शकता.

ॲपल वॉच सीरिज 7 चे फिचर्स

ॲपल वॉच सीरिज 7 मोठा डिस्प्ले उपलब्ध करते. ॲपलने बेझल कमी करून 1.7 मिमी केला आहे, जो वॉच सीरीज 6 पेक्षा 40 टक्के लहान आहे. यामुळे घड्याळाचा डिस्प्ले 20 टक्क्यांनी वाढू शकतो. ॲपल वॉच 7 हे 41mm आणि 45mm केस पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ॲपल वॉच 7 सीरिज ऑन रेटिना डिस्प्ले ऑफर करते. ॲपलचा असाही दावा आहे की डिस्प्ले टेक्स्टसाठी येथे अधिक जागा उपलब्ध होइल.

ॲपल वॉच सीरिज 7 इलेक्ट्रिकल हार्ट रेट सेन्सरद्वारे (एसपीओ 2) ट्रॅकिंग आणि हार्ट रेट ट्रॅकिंग करते. यात ॲट्रियल फायब्रिलेशन (AFib) देखील शोधू शकता.

ॲपल वॉच सीरीज 7 , 18 तासांची बॅटरी लाईफ देते, दरम्यान यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जर, मागील सीरिजपेक्षा 33 टक्के फास्ट चार्जिंग ऑफर करते.

Comments are closed.