पनामा पेपर्स नंतर पँडोरा पेपर्स, अनेकांचे धाबे दणाणले

Among the politicians linked with offshore dealings, India is shown as having six in ‘Pandora Papers’, according to a report.

इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सने 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या अहवालात आपली गुंतवणूक लपवणाऱ्यामध्ये सचिन तेंडुलकर, काही जागतिक नेते, राजकारणी यांचे नाव घेतले आहे.

संबंधित लोकांनी कोट्यवधी डॉलर्सच्या मालमत्ता संरक्षणासाठी ऑफशोअर खात्यांचा केलेला वापर आणि अनेक व्यवहारावर टाकलेला पडदा सदर अहवालामुळे उघडकीस आला, म्हणून यास ‘पेंडोरा पेपर्स’ म्हणून संबोधले जात आहे.

117 देशांतील 150 माध्यमांच्या 600 पत्रकारांचा आणि 11.9 मिलियनहून अधिक नोंदींचा समावेश असलेला हा अहवाल, “पनामा पेपर्स” लीकनंतर पाच वर्षांनी आला आहे. मात्र यावर नंतर काहीच पुष्टी मिळाली नाही.

इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फाईलमध्ये सुमारे भारतासह 91 देशातील, 35 वर्तमान आणि माजी राष्ट्रीय नेते आणि 330 हून अधिक राजकारणी आणि अधिकारी यांच्या संबंधित माहिती उपलब्ध आहे.

आयसीआयजेने आपल्या अहवालात म्हटले आहे, ” यात भारताचा क्रिकेट सुपरस्टार सचिन तेंडुलकर, पॉप गायक शकीरा, सुपरमॉडेल क्लाउडिया शिफर आणि लेल द फॅट वन म्हणून ओळखले जाणारे इटालियन मोबस्टर यांचा समावेश आहे.”

दरम्यान सचिनच्या वकिलांनी सांगितले की, “त्याची गुंतवणूक कायदेशीर आहे आणि कर अधिकाऱ्यांना याबाबत माहिती आहे.” शकीराच्या वकिलांनी सांगितले की, “तीने तिच्या कंपन्या घोषित केल्या आहेत, आणि त्यांना कसलाही कर लाभ मिळत नाही.” शिफरच्या वकिलांनी सांगितले की, “ती युकेमध्ये तिचा कर योग्यरित्या भरते”.

ऑफशोर व्यवहारांत 6 भारतीय राजकारण्यांची नावे आहेत, पण अद्याप ती समोर आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय राजकारण्यांपैकी जॉर्डन किंग अब्दुल्ला, यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस, केनियाचे राष्ट्रपती उहुरू केन्याटा, इक्वाडोरचे अध्यक्ष गिलर्मो लासो तसेच पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सहकाऱ्याचा यात समावेश आहे.

सदर अहवालात अब्जाधीशांचा देखील समावेश आहे, त्यात तुर्कीच्या एरमन इलिकॅक आणि सॉफ्टवेअर निर्माता रेनॉल्ड्स आणि रेनॉल्ड्सचे माजी सीईओ रॉबर्ट टी ब्रोकमन यांचा समावेश आहे.

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, यातील अनेक खाती ही कर टाळण्यासाठी आणि मालमत्ता लपवण्यासाठी तयार करण्यात आली होती.

‘पेंडोरा पेपर्स’ आणि ‘पनामा पेपर्स’ चे शोधकर्ते हे एकच आहेत. सदर अहवालात जवळजवळ 3 टेराबाइट डेटा इतका आहे. म्हणजेच स्मार्टफोनमधील सुमारे 7,50,000 फोटो. सदर फाईल्स 1996 ते 2020 पर्यंतच्या आहेत.

दरम्यान पनामा पेपर्समध्ये 2.6 टेराबाइट्स इतका डेटा होता.

Comments are closed.