चला फिरायला! IRCTC ऑफर करतेय मस्त टूर प्लॅन, वाचा काय आहे ऑफर?

The special train will take passengers to places that are not just far from the crowd but also are untouched, unexplored and unimaginable.

ANI ने दिलेल्या बातमीनुसार ‘देखो अपना देश’ उपक्रमाअंतर्गत IRCTC लवकरच ईशान्येकडील पाच राज्यांमध्ये एक विशेष पर्यटन रेल्वे सुरू करणार आहे. या रेल्वेतून प्रवासाचा कालावधी 14 रात्री आणि 15 दिवसांचा असेल.

IRCTC च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘देखो अपना देश’ एसी डिलक्स टूरिस्ट ट्रेन प्रवाशांना गर्दीपासून दूरच नेणार नाही तर त्यांना अकल्पनीय अशा ठिकाणी नेईल.

ईशान्येकडील पर्यटनासाठी स्पेशल टुरिस्ट ट्रेन ही IRCTC द्वारे चालवली जाणारी पहिलीच असेल. ही यात्रा दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होईल आणि आसाममधील गुवाहाटी, काझीरंगा आणि जॉनहार्ट, अरुणाचल प्रदेशातील इटानगर, नागालँडमधील कोहिमा, त्रिपुरामधील उना कोटी, अगरतला आणि उदयपूर आणि शिलाँग आणि चेरापुंजी या पाच प्रमुख राज्यांचा समावेश यात असेल.

गाझियाबाद, टुंडला, कानपूर, लखनौ, वाराणसी आणि पाटणा हे इतर बोर्डिंग पॉईंट असतील. संबंधीत प्रवास 26 नोव्हेंबरपासून सुरू होईल. एसी टू-टायरसाठी भाडे प्रति व्यक्ती 85,495 रुपये आणि प्रथम श्रेणी एसीसाठी 1,02,430 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरू होईल. केवळ पूर्णपणे लसीकरण केलेले लोकच प्रवास करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे.

टूर पॅकेजमध्ये आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी आणि मेघालयातील रूट ब्रिजवर एक ट्रॅक यांचा समावेश आहे. प्रवाशांना आसाममधील कामाख्या मंदिर आणि त्रिपुरातील त्रिपुर सुंदरी मंदिराला भेट देण्याची संधी मिळेल.

निसर्ग प्रेमींसाठी ब्रह्मपुत्रा नदीवरील प्रवास आणि आसाममधील चहाच्या बागांचा दौरा नियोजित करण्यात आला आहे.भारतीय इतिहास आवडणाऱ्यांसाठी त्रिपुरामधील उना कोटी शिल्प, उज्जयंता पॅलेस आणि नीरमहल पॅलेस यांचा समावेश करण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरकारी कर्मचारी या प्रवासात LTC सुविधा घेऊ शकतात.

Comments are closed.