क्रिप्टोला येणार अच्छे दिन! ही फर्म उभरतेय ‘इतके’ कोटी

CoinSwitch Kuber, a cryptocurrency platform for retail traders has raised $260 million in what is the largest funding round by any crypto company in India.

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कॉइन्सविच कुबेरने 6 ऑक्टोबर रोजी म्हटले की त्यांनी नवीन गुंतवणूकदार कॉईनबेस व्हेंचर्स आणि टॉप सिलिकॉन व्हॅली फंड अँड्रीसेन होरोविट्झ यांच्या नेतृत्वाखाली 260 मिलियन डॉलर्सची उभारणी केली आहे. दरम्यान सहा महिन्यांत कंपनीचे मूल्य चार पटीने वाढून 1.9 अब्ज डॉलरवर गेले आहे.

टायगर ग्लोबल, सेक्वॉया कॅपिटल आणि पॅराडाइमनेही कंपनीत गुंतवणूक केली आहे. या करारामुळे स्टार्टअप फंड उभारणीसाठी या वर्षात कॉइन्सविच भारताचे दुसरे क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न आणि 2021 मधील एकूण 30 वे युनिकॉर्न बनले आहे. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक मूल्याच्या खाजगी कंपन्या होय.

कॉइन्सविच ची स्थापना 2017 मध्ये आशिष सिंघल, गोविंद सोनी आणि विमल सागर तिवारी यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे जागतिक एग्रीगेटर म्हणून केली होती. जून 2020 मध्ये, त्यांनी कुबेर, क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म लॉन्च केले, ज्याचे 4.5 मिलियन युजर्स आहेत. कंपनीचे वार्षिक उत्पन्न सुमारे 50 मिलियन डॉलर आहे.

आतापर्यंतच्या ग्राहक बेसच्या तुलनेत, अधिक ॲसेट निर्माण करणे, क्रिप्टोकरन्सीबद्दल जागरूकता पसरवणे, संस्थात्मक ग्राहकांना आकर्षित करणे तसेच इंजिनीअरिंग टॅलेंट, प्रॉडक्ट आणि डेटा फंक्शन्समध्ये टॅलेंट नियुक्त करण्यासाठी हा फंड वापरण्याची योजना आहे.

सिंघल म्हणाले, “कॉइन्सविच हे कुबेर क्रिप्टो अधिक सुलभ करून भारतीयांसाठी ॲसेट निर्माण करण्याचा प्रयत्न करते. माझा विश्वास आहे, भारतीय युवकांसाठी क्रिप्टो गुंतवणूक सुलभ केल्याने आम्हाला याचा फायदाच झाला आहे. आम्हाला क्रिप्टो ट्रेडिंगमधील सर्व गुंतागुंत दूर करायची होती, ग्राहकांना शिक्षित करायचे आहे आणि त्यांना एका क्लिकवर क्रिप्टो खरेदी-विक्री उपलब्ध करायचीय”.

गेल्या महिन्यात 10 मिलियन युजर्सपर्यंत पोहोचलेली एक्सचेंज आता पुढील काही वर्षांत 50 मिलियन युजर्सपर्यंत पोहोचू इच्छित आहे.

कंपनीचे पार्टनर म्हणाले, “आम्ही भारतातील क्रिप्टो मार्केटच्या संधीबद्दल उत्साहित आहोत आणि ह्या वाढीसह कॉइन्सविच देशातील आघाडीचे रिटेल प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे”.

Comments are closed.