डेटा पॅटर्नची धमाकेदार लिस्टिंग! ‘इतक्या’ प्रीमियमवर झाला लिस्ट

डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्राला इलेक्ट्रॉनिक सिस्टम पुरवणाऱ्या डेटा पॅटर्न (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी 585 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत जवळपास 47 टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी सदर शेअर्स 47 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग झाले.

BSE वर शेअर 864 रू आणि NSE वर 856 रू वर उघडला. 585 रुपये प्रति शेअर ही सदर शेअर्सची इश्यू किमत होती.

IPO वॉचच्या डेटानुसार, पदार्पणाच्या काही तास आधी डाटा पॅटर्न शेअर ग्रे मार्केटमध्ये 45 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते.

Data Patterns च्या 588 कोटी IPO ने 555-585 रु च्या प्राइस बँडसह IPO लॉन्च केला होता. 13-15 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुल्या असलेल्या इश्यूला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि बिडिंगच्या शेवटच्या दिवशी सुमारे 120 पट सबस्क्रिप्शन घेतले गेले. IPO मध्ये ऑफर केलेल्या 71 लाख इक्विटी शेअर्सच्या तुलनेत 85 कोटी इक्विटी शेअर्ससाठी त्याला बोली मिळाली होती.

रिटेल गुंतवणूकदारांनी अंतिम दिवशी 24 पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन घेतली होती आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एक्सचेंजेसच्या डेटानुसार 40 वेळा बुकिंग केले होते. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी सुमारे 190 वेळा इश्यूचे सबस्क्रिप्शन घेतले.

Comments are closed.