ईपीएफ अकाऊंटला आधार कार्ड लिंक करून घ्या, नाहीतर होईल मोठा तोटा 

If AADHAR is not linked with EPF, you may lose benefits

तुमचे ईपीएफ अकाऊंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर आता मोठा फटका बसू शकतो. हे दोन अकाऊंट लिंक्ड असतील तरच तुमची कंपनी तुमचा पीएफ जमा करू शकणार आहे. याची अंमलबजावणी या महिण्यापासून सुरु होत आहे. याबाबत एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एक पत्रक काढून सर्व कंपन्यांना कळविले आहे. हा बदल कोड ऑफ सोशल सिक्युरिटी २०२० च्या सेक्शन १४२ अंतर्गत करण्यात आला आहे.

हा बदल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी अशा दोघांना लागू असणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा UAN (Universal Account Number) आणि आधार कार्ड लिंक नसतील तर कंपनी इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ECR) अपलोड करू शकणार नाही. आत्तापर्यंत ही दोन अकाऊंट लिंक्ड असणे बंधनकारक नव्हते. EPF रजिस्ट्रेशन करताना आधारची गरज लागत नसली तरी विड्रॉवल करताना आधारची गरज पडत होती. आता मात्र EPF रजिस्ट्रेशनसाठी देखील आधार कार्डची गरज लागणार आहे.

त्यामुळे या महिन्यातच ही दोन अकाऊंट लिंक करून घेणे योग्य ठरणार आहे. www.epfindia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकता. जोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पीएफ अकाऊंटचा तुमचा ऍक्सेसदेखील बंद होणार आहे. तुम्ही या अकाऊंटमधून पैसे काढणे, लोन घेणे किंवा इतर सुविधा वापरू शकणार नाही. ज्या लोकांच्या आधारकार्ड वरील नाव आणि पीएफ अकाऊंटवरचे नाव यात फरक आहे त्यांना याचा आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधातील फ्रेशर असाल तर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि

Comments are closed.