लवकरच आंतरराष्ट्रीय भरारी! ‘या’ तारखेला होणार नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु

कोविडमुळे बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच सुरु करण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. तब्बल 20 महिन्यानंतर भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु केले जातील.15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू करण्याची सरकारने घोषणा केली आहे.

कोविडमुळे बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच सुरु करण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. तब्बल 20 महिन्यानंतर भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु केले जातील.15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू करण्याची सरकारने घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँगसह 12 देशांत सध्या कोरोनाचा नविन विषाणू धुमाकूळ घालत आहे म्हणून तेथे निर्बंध कायम राहतील.

मे 2020 मध्ये देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू झाली असताना, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना काही मार्गांवर केवळ द्विपक्षीय बबल व्यवस्थेनुसारच ऑपरेट करण्याची परवानगी होती.

परराष्ट्र व्यवहार,आरोग्य आणि गृह मंत्रालयांशी सल्लामसलत केल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.

नियोजित उड्डाणे पुन्हा सुरू करणे म्हणजे एअर बबल वाहतूक व्यवस्था संपुष्टात आणून प्रवाशांना फिरण्यासाठी एक विस्तृत प्रवास पर्याय उपलब्ध असेल.

यापूर्वी, ट्रॅव्हल कंपन्या, परदेशी सरकारे आणि भारतीय डायस्पोराच्या सदस्यांच्या दबावामुळे भारताने 15 नोव्हेंबरपासून परदेशी पर्यटकांसाठी आपली सेवा सुरु केली होती.

ताज्या निर्णयानुसार, सर्व देशांना दोन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे – ‘नॉट रिस्क’ आणि ‘ॲट रिस्क’ यानुसार उड्डाण करण्यास परवानगी दिली जाईल.

26 नोव्हेंबरपर्यंत, 12 देशांना ‘ॲट रिस्क’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. यामध्ये युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे.

 

मार्च 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाउनच्या घोषणेसह आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती.जुलै 2020 पासून भारताने इतर देशांसोबत हवाई वाहतूक बबल करारांवर स्वाक्षरी करण्यास सुरुवात केली. सध्या भारताचे 31 देशांशी असे करार आहेत.

 

हवाई प्रवासाची वाढती मागणी आणि क्षमतेच्या मर्यादांमुळे परदेशातील हवाई भाड्यात भरपूर वाढ झाली.

Comments are closed.