भारतात झाल्या ४० युनिकॉर्न, कोण आहे नवा मानकरी? – वाचा सविस्तर

Upstox becomes 40th Indian Unicorn in 2021

ऑनलाईन स्टॉकब्रोकर अप्स्टॉक्सचा (Upstox) आता युनिकॉर्नच्या यादीत समावेश झाला आहे. टायगर ग्लोबल या नावाजलेल्या कंपनीकडून येणाऱ्या फंडिंग राऊंडसाठी अप्स्टॉक्सचे व्हॅल्युएशन ३ ते ३.५ बिलियन डॉलर्स एवढे होईल असा अंदाज आहे. टायगर ग्लोबलने अप्स्टॉक्समध्ये १८५ कोटी रुपये किंवा २४.७ मिलियन डॉलर्स गुंतवले आहेत. मात्र या फंडिंग राऊंडमम्मध्ये एकूण किती निधी उभारला गेला याची नेमकी माहिती अजून उपलब्ध नाही.

यामुळे अप्स्टॉक्स ही २०२१ मध्ये युनिकॉर्न बनणारी भारतातील ४० वी कंपनी ठरली आहे. याआधी २०१९ साली अप्स्टॉक्समध्ये टायगर ग्लोबलने २५ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. तेव्हापासुन अप्स्टॉक्स युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रतन टाटा, कालारी कॅपिटल यांनीदेखील अप्स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेली आहे.

अप्स्टॉक्सची सुरुवात २००९ साली मुंबईत झाली. श्रीनी विश्वनाथ, रघु कुमार, कविता सुब्रमणियन आणि रवी कुमार यांनी आरकेएसव्ही सिक्युरिटीज नावाने ही कंपनी सुरु केली होती. कंपनीने २०११ मध्ये रिटेल ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि २०१६ मध्ये आपले नाव अप्स्टॉक्स असे बदलले. झिरोधा, ग्रो, पेटीएम मनी हे अप्स्टॉक्सचे स्पर्धक आहेत.

२०२२ अखेरीस कंपनीच्या युजर्सची संख्या १ कोटीपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष आहे असे श्रीनी विश्वनाथ यांनी सांगितले होते. आम्ही फक्त एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म न राहता आम्हाला एक वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बनायचे आहे. लवकरच आम्ही इंटरनॅशनल ट्रेडिंग आणि फिक्स्ड डिपॉझिट सेवा सुरु करू असेही त्यांनी सांगितले. अप्स्टॉक्सच्या एकूण युजर्सपैकी ८०% जण टियर २ आणि टियर ३ शहरातील आहेत. यापैकी ७०% लोक हे पहिल्यांदा गुंतवणूक करणारे म्हणजेच फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यातले ८०% जण १८-३५ या वयोगटातील आहेत.

Comments are closed.