एअरटेलला मिळाला मोठा मान, ‘ही’ ट्रायल करणारी पहिली भारतीय कंपनी

भारती एअरटेलने आज जाहीर केले की, त्यांनी नोकियासोबात पार्टनरशिपमध्ये 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये भारतातील पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

भारती एअरटेलने आज जाहीर केले की, त्यांनी नोकियासोबात पार्टनरशिपमध्ये 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये भारतातील पहिली 5G चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

सदर चाचणी कोलकात्याच्या बाहेरील भागात घेतली गेली आणि पूर्व भारतातील ही पहिली 5G चाचणी देखील होती. एअरटेल आणि नोकिया यांनी 700 मेगाहर्ट्झ बँडच्या क्षमेतचा वापर करून, 40 किमी वरील दोन 5G साइट्स दरम्यान हाय स्पीड वायरलेस ब्रॉडबँड नेटवर्क कव्हरेजची चाचणी यशस्वी केली.

भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सिंग सेखॉन म्हणाले, “एअरटेलने 2012 मध्ये कोलकाता येथे भारतातील पहिली 4G सेवा सुरू केली होती. आज, 700 MHz बँडमध्ये भारतातील पहिला 5G डेमो आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की आम्ही उत्कृष्ट तऱ्हेने 5G सेवा पुरवू.”

नरेश असिजा, नोकिया आणि भारती सीटीचे प्रमुख, म्हणाले, “700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम वापरून 5G ची सेवा ही जगभरातील कम्युनिकेशन सर्व्हिससाठी महत्वाची ठरेल.नोकिया जागतिक 5G इकोसिस्टमच्या विकासात आघाडीवर आहे आणि आम्ही एअरटेलला त्याच्या 5G सिस्टम पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत.”

याआधी एअरटेलने दिल्लीच्या बाहेर ग्रामीण भागात 5G ट्रायल घेतली होती. त्यावेळी त्यांनी एरिकसन कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले होते. कंपनीने #5GforBusiness चा भाग म्हणून, 5G आधारित सोल्यूशन्सची चाचणी घेण्यासाठी विविध ब्रँडशी हातमिळवणी केली आहे.

Comments are closed.