प्रमोटर्सने स्टेक वाढवलाय, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

बल्क डील डेटानुसार कृषी रसायन कंपनी UPL लिमिटेडचे एकूण 1.37 लाख इक्विटी शेअर्स Uniphos Enterprises Ltd ने विकत घेतले आहेत. त्यामुळे हा स्टॉक 25 नोव्हेंबर रोजी फोकसमध्ये होता आणि 726.45/शेअर वर ट्रेडिंग करत होता.

युनिफॉस एंटरप्रायझेसने 22 नोव्हेंबर रोजी कंपनीचे 68,000 शेअर्स खरेदी केले, त्यानंतर दुसर्‍या दिवशी आणखी 69,000 शेअर्स खरेदी केले. यामुळे कंपनीची UPL मधील शेअरहोल्डिंग 5.15% वरून आता 5.17% पर्यंत वाढली आहे. आता कंपनीकडे युपीएलचे एकूण 3,95,19,431 शेअर्स आहेत.

जागतिक पातळीवरील आघाडीची रिसर्च फर्म जेफरीज या लार्ज-कॅप कंपनीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी 945/शेअरच्या टारगेट किंमतीसह स्टॉकवर ‘बाय’ कॉल दिला आहे जो त्याच्या आताच्या किंमतीच्या 30% वर आहे. पुढील दोन वर्षांत UPL ची विक्री 9% आणि नफा 25% वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आज सकाळी मार्केट सुरु झाल्यावर शेअर 925 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यानंतर मार्केटमध्ये झालेल्या पडझडीमुळे शेअर 704 रुपयांपर्यंत खाली आला होता.

Comments are closed.