लस घेतलीय पण अजून पासपोर्ट सर्टिफिकेटला लिंक नाही केला? तर मग हे करा

Linking your passport with the vaccine certificate is necessary if you want to travel abroad.

सध्या कोविडमुळे बऱ्याच ठिकाणी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल तर आता तुमच्या पासपोर्टला वॅक्सीन सर्टिफिकेट लिंक करणे बंधनकारक आहे.

तुमचा पासपोर्ट कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेटशी लिंक करण्यासाठी खालील स्टेप वापरा.

स्टेप 1: जर तुम्ही आधीच वेगळ्या फोटो आयडी आधारे लस घेतली असेल, तर www.cowin.gov.in ला भेट द्या.

स्टेप 2: “अकांउट डिटेल” सेक्शनमधील ” रेझ इश्यू” बटणावर क्लिक करा.

स्टेप 3: सर्टिफिकेट करेक्शन मधील तीन पर्यायांपैकी ” ॲड पासपोर्ट डिटेल” वर क्लिक करा.

स्टेप 4: “इंटर बेनिफिशअरी पासपोर्ट नंबर” सेक्शनमध्ये आपला पासपोर्ट नंबर टाका.

स्टेप 5: हे झाल्यावर, “I declare that this passport belongs to the beneficiary. The name of the passport holder is the same as mentioned on the vaccine certificate.” वर क्लिक करा.

स्टेप 6: “रिक्वेस्ट सबमिट” क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर अपडेट बाबत मेसेज येईल.

स्टेप 7: अकाउंट डिटेल पेजवर परत जा आणि “सर्टिफिकेट” बटणावर क्लिक करा. तुम्ही तुमच्या पासपोर्टशी लिंक केलेले तुमचे नवीन व्हॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकाल.

Comments are closed.