ना ह्युंदाई, ना किया, ना टाटा, आता आली फोक्सवॅगनची नवी गाडी

The model will compete with Hyundai Creta, Kia Seltos and Tata Harrier

जर्मन ब्रँड फोक्सवॅगनची नवी एसयूव्ही Taigun भारतात लॉन्च करण्यात आली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये पासून सुरू होते, तर कारच्या टॉप-एंड व्हर्जनची किंमत 17.49 लाख रुपये आहे.ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा हॅरियर यांच्याशी स्पर्धा करेल.फोक्सवॅगन ग्रुपचे इंडिया 2.0 प्रोग्राम अंतर्गत हे पहिलेच पाऊल आहे. कंपनीने 2025 पर्यंत 3 टक्के बाजारपेठ व्यापण्याचे लक्ष समोर ठेवले आहे.

एकंदरीत MQBAO-IN प्लॅटफॉर्मवर तयार केलेली Taigun 115 शहरांमध्ये आणि 150 टचपॉईंट्सवर उपलब्ध असेल. हा प्लॅटफॉर्म स्कोडाच्या Kushaq या गाडीमध्येदेखील वापरण्यात आला आहे. एकूणच, Taigun किंमतीच्या बाबतीत एमजी एसटर आणि होंडाच्या आगामी एसयूव्हीसह स्पर्धा करेल.फोक्सवॅगनने दावा केला आहे की 18 ऑगस्टपासून Taigun साठी 12,221 पेक्षा जास्त बुकिंग झाली आहे.

या गाडीमध्ये TSI टेक्नॉलॉजी असून आणि अनुक्रमे 1.0L (115ps) आणि 1.5L (150ps) या दोन पेट्रोल-इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल.Taigun 1.5-लीटर व्हर्जनमध्ये 7-स्पीड डीएसजी आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. तर 1 लिटर व्हर्जनमध्ये 6-स्पीड डीएसजी आणि मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. कंपनीने प्रति लिटर 18.47 किमी ऍव्हरेजचा दावा केला आहे.

कारमध्ये 25.6 cm टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस मोबाईल चार्जिंग, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, व्हेंटिलेटेड सीट, रियरव्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स, हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी अशी फिचर्स आहेत.या गाडीचे 95 टक्के स्पेअरपार्टस स्थानिक बाजारपेठेतून सोर्स केलेले आहेत. पुण्याजवळील चाकण एमआयडीसीमध्ये ही कार तयार केली जात आहे. जेथे तीन शिफ्टच्या आधारावर प्रति वर्ष जास्तीत जास्त 180,000 युनिट्स उत्पादन होऊ शकते.

Comments are closed.