इंटरनेट चालत नाही, ऑनलाईन पेमेंट कसं करु? चिंता नको, हे आहे सोल्युशन

Before you do anything, you need to download the BHIM app and complete the one-time registration process so that you can conduct offline UPI transactions.

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंटची लोकप्रियता वाढत आहे. कोविडचा उद्रेक आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन पेमेंट ही एक गरज बनली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी देखील लोक ऑनलाईन व्यवहार करतात. यामुळे सध्या ऑनलाईन व्यवहार तेजीत आहेत.

नेट बँकिंग आणि कार्ड पेमेंट सारख्या पद्धती अस्तित्वात असताना यांच्या तुलनेत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( यूपीआय ) ही पध्दत सोपी आहे. यात पेमेंट करण्यासाठी काही क्लिक आणि एक कोड एंट्री पुरेसी असते. याकरिता ग्राहकाला कार्ड किंवा खाते नंबर तसेच ओटीपीची गरज नसते. ही सेवा गूगल पे, फोन पे , पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक, अमेझॉन पे इत्यादी प्लॅटफॉर्मवर वापरली जाऊ शकते .

परंतु यूपीआय ट्रान्सजेक्शन करण्यासाठी या प्लॅटफॉर्मला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. मग जर तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे पाठवायचे असतील तर काय करावे, तर यासाठी तुम्ही नॅशनल युनिफाइड यूएसएसडी प्लॅटफॉर्म (NUUP) वापरू शकता. ज्याला ‘*99#’ सेवा म्हणून ओळखले जाते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ( NPCI ) यूपीआय नेटवर्क सुरू करण्याच्या जवळपास चार वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2012 मध्ये यूएसएसडी सेवा सुरू केली होती. या दोन डिजिटल पेमेंट पद्धती नंतर एकत्रित केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे युजर्सना इंटरनेट कनेक्शनशिवायही UPI ट्रान्सजेक्शन करता येतात.

खालील माहितीद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी *99# सर्व्हिसचा वापर करू शकता.

स्टेप 1: जर तुम्हाला तुमचे UPI अकाउंट तयार करायचे नसेल तर भीम ॲपवर तुमची नोंदणी करा. फोन नंबर आणि बँक अकाउंट लिंक असल्याची खात्री करा.

स्टेप 2: आपल्या फोनच्या डायलरवर जा, ‘*99#’ टाका आणि कॉल बटण दाबा. यातून तुम्हाला सात पर्यायांचा मेनू येइल, ज्यात पैसे पाठवा, पैसे मिळवा, शिल्लक तपासा, माझे प्रोफाइल, प्रलंबित विनंत्या, व्यवहार आणि यूपीआय पिन यांचा समावेश असेल.

स्टेप 3: पैसे पाठवण्यासाठी, 1 टाइप करा. यामुळे तुम्ही तुमचा UPI ID, बँक अकाऊंट नंबर, IFSC कोड किंवा फोन नंबर वापरून व्यवहार करू शकता. आपल्या आवडीची पद्धत निवडा.

स्टेप 4: तुम्ही UPI निवडल्यास तुम्हाला रिसिपेंटचा UPI ID टाकावा लागेल. जर तुम्ही बँक अकाउंट निवडले, तर तुम्हाला संबंधीत व्यक्तीचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकावा लागेल. आपण फोन नंबर पर्यायावर गेलात तर, आपल्याला रिसिपेंटचा फोन नंबर टाकणे आवश्यक आहे.

स्टेप 5: आता तुम्हाला इतर कोणत्याही डिजिटल ट्रान्सजेक्शन प्लॅटफॉर्म प्रमाणेच तुम्हाला ट्रान्स्फर करायची रक्कम टाकायची आहे.

स्टेप 6: शेवटच्या टप्प्यात तुमचा UPI पिन नंबर टाका. ट्रान्सजेक्शन पूर्ण करण्यासाठी ‘सेंड’ क्लिक करा. ट्रान्सजेक्शन पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या फोनवर एक कन्फर्मएशन दिसेल. ह्या संपूर्ण प्रोसेससाठी तुम्हाला 50 पैसै इतके शुल्क लागेल .

Comments are closed.