उठा! उठा! अजून एक IPO येण्याची वेळ झाली, येतोय ‘हा’ IPO

Aditya Birla Group’s AMC arm, Aditya Birla Sun Life AMC IPO will open for subscription on 29 September, at a price band of Rs 695-712 per share of face value of Rs 5 each.

आदित्य बिर्ला ग्रुपची AMC (आदित्य बिर्ला सन लाइफ AMC) चा IPO 29 सप्टेंबर रोजी येण्याची शक्यता आहे, जो 1 ऑक्टोबर ला बंद होईल. इश्यूची किंमत बँड 695 ते 712 रू रुपये प्रती शेअर असण्याची अपेक्षा आहे.

सूत्रांनी सांगितले की एकूण इश्यू साइझ 2,770 कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ABSL AMC मधील 13.5% स्टेक IPO द्वारे पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. कंपनीतील सर्वात मोठा स्टेकहोल्डर कॅनेडियन JV आपल्या 49% स्टेकपैकी 12.5% ​ शेअर्स विक्रिसाठी उपलब्ध करेल. आदित्य बिर्ला कॅपिटल 51% टक्यापैकी 1% स्टेक विकेल.

IPO चे व्हॅल्यूएशन थोडे जास्त होणे अपेक्षित आहे. कंपनीला 28,000-29,000 कोटी रुपयांच्या लिस्टिंगमध्ये व्हॅल्यूएशन होण्याची अपेक्षा आहे. ABCL MF निप्पॉन इंडियाला प्रीमियम देण्याची शक्यता आहे.”

मार्केट तज्ञांच्या मते, “ABSL AMC आपली मूळ कंपनी AB कॅपिटलला पोस्ट लिस्टिंगच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये मागे टाकण्याची शक्यता आहे.

Comments are closed.