रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडाने रोवले पाय – वाचा सविस्तर

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी होंडा रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी मोटरसायकल सेगमेंटमध्ये नविन उत्पादने लाँच करण्याचा विचार करत आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी होंडा रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी मोटरसायकल सेगमेंटमध्ये नविन उत्पादने लाँच करण्याचा विचार करत आहे.

होंडाकडे सध्या CB350 आणि CB35ORS मध्यम वजनाच्या मोटरसायकल विभागात ही दोन उत्पादने आहेत. स्थानिक पातळीवर कंपनी पुढील तीन वर्षांत प्रतिवर्ष 300,000 युनिट्सच्या विक्रीचे लक्ष्य ठेवत आहे.

अत्सुशी ओगाटा, अध्यक्ष, HMSI यांनी सांगितले की,“लवकरच आमच्याकडे पोर्टफोलिओसह आमची नवीन लाइन अप असेल. मिड सीसी सेगमेंटमधील मॉडेल्सची संख्या वाढवली जाईल. 3 वर्षात नक्कीच विक्री 3 लाखांपर्यंत जाईल.

होंडाकडे सध्या सुमारे 70 बिग विंग आउटलेट्स आहेत. पुढील तीन वर्षांत 300 ग्राहक टच पॉइंट्सपर्यंत ते वाढवले जातील. कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस टॉप 50 UIO (कार्यरत युनिट्स) क्षेत्रे कव्हर करण्यासाठी 100 बिग विंग आउटलेट्स ठेवण्याचे काम करत आहे.

पुढील 3 वर्षांत बिग विंग टच पॉइंट्स 300 पर्यंत नेण्याचा कंपनीला विश्वास आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत 250-500 सीसी इंजिन क्षमतेच्या तब्बल 276,365 मोटारसायकली स्थानिक बाजारपेठेत विकल्या गेल्या.

दरम्यान यात 244,964 युनिट्सच्या विक्रीसह, रॉयल एनफिल्डचा एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान 88.6% वाटा होता. परंतु, सध्या कंपनीला विक्रीसाठी स्पर्धेचा सामना करावा लागत आहे, कारण त्यांचा बाजार हिस्सा वर्षापूर्वीच्या कालावधीत 700 बेसिस पॉइंटने घसरला आहे.

होंडाच्या उत्पादनांची किंमत 1.89-1.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे, तर रॉयल एनफिल्डच्या एंट्री मॉडेल बुलेट 350 ची किंमत 1.38 लाख (एक्स-शोरूम) च्या वर आहे. कंपनीने सेगमेंटमध्ये Classic 350 (1.84 लाखाच्या वरची किंमत), हिमालयन (2.10 लाखांच्या वरची किंमत) आणि मेटेओर (1.98 लाखांच्या वरची किंमत) चे BSVI वर्जन देखील ऑफर केले आहेत.

Comments are closed.