कॅश ट्रान्झॅक्शन, एटीएम वापर यासाठी बँका किती पैसे आकारतात?

Various charges one has to pay for savings account

दैनंदिन जीवनात वापरासाठी जवळपास सगळ्यांचेच सेव्हिंग्ज अकाऊंट असतेच. अर्थात हे अकाऊंट वापरताना बँका काही पैसे आकारतात. अगदी एसबीआयपासून ते भारतातील सगळ्याच आघाडीच्या बँका ग्राहकांकडून हे पैसे आकारत असतात. मात्र हे पैसे नक्की कशासाठी आणि किती आकारले जातात?

कॅश ट्रान्झॅक्शन – एका महिन्यात तीनपेक्षा अधिक (काही बँकांच्या बाबतीत पाचपेक्षा अधिक) कॅश ट्रान्झॅक्शन केले तर त्यापुढील सर्व कॅश ट्रान्झॅक्शनला बँकांकडून फी आकारली जाते.

एटीएममधून पैसे काढणे – बऱ्याच बँका एका महिन्यात एटीएममधून पाच ट्रान्झॅक्शन करू देतात. आपली बँक सोडून इतर बँकेच्या एटीएममध्ये कार्ड वापरण्यासाठी तीन ट्रान्झॅक्शनची मर्यादा आहे. मात्र या आठ ट्रान्झॅक्शनपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास एसबीआय आणि आयसीआयसीआय या बँकांकडून २० ते ५० रुपयांच्या दरम्यान फी आकारली जाते. इतर बँकादेखील या जास्तीच्या ट्रान्झॅक्शनसाठी पैसे आकारतात.

आयएमपीएस (IMPS) ट्रान्सफर – पैसे ट्रान्सफर करण्यासाठी असलेल्या NEFT आणि  RTGS या सुविधा आता फ्री उपलब्ध आहेत. मात्र IMPS या सुविधेसाठी अजूनही बँकांकडून पैसे आकारले जातात. किती पैसे ट्रान्सफर केले जात आहेत यावर ही फी अवलंबून असते. साधारपणे १ रुपया ते २५ रुपये या दरम्यान ही फी आकारली जाते.

फेल्ड एटीएम ट्रान्झॅक्शन – तुमच्या अकाऊंटमध्ये पुरेसा बॅलन्स नसताना तर तुम्ही एटीएममधून पैसे काढले तर ते ट्रान्झॅक्शन फेल होते. अपुऱ्या बॅलन्समुळे फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनसाठी बँकांकडून फी आकारली जाते. एसबीआयकडून अशा फेल्ड ट्रान्झॅक्शनसाठी २० रुपये अधिक जीएसटी तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक यांच्याकडून २५ रुपये आकारले जातात.

मिनिमम बॅलन्स – अकाऊंटमध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स राखणे अपेक्षित असते. प्रत्येक बँकेने अकाऊंटच्या प्रकारानुसार आणि कोणत्या शाखेत अकाऊंट आहे यानुसार मिनिमम बॅलन्सची रक्कम ठरवून दिलेली असते. आयसीआयसीआय बँकेकडून मेट्रो शाखांमध्ये मिनिमम बॅलन्स १० हजार रुपये तर सेमी अर्बन आणि रुरल शाखांमध्ये ५ हजार रुपये ठरवून दिलेला आहे. जर हा ऍव्हरेज मिनिमम बॅलन्स राखला नाही तर बँकेकडून त्यासाठी १०० रुपये अधिक कमी पडत असलेल्या रकमेच्या ५% एवढा दंड आकारते.

डॉक्युमेंट्स – तुम्हाला विविध कामांसाठी बँकाकडून स्टेटमेंट सारखी डॉक्युमेंट्स लागत असतील तर त्यासाठी बँका पैसे आकारतात. एसबीआयकडून सिग्नेचर व्हेरिफिकेशनसाठी १५० रुपये आकारले जातात. बऱ्याच बँका वर्षातून एकदा अकाऊंट स्टेटमेंट फुकट देतात. मात्र डुप्लिकेट स्टेटमेंटची मागणी केल्यास ५० ते १०० रुपये आकारले जातात.

डेबिट कार्डासाठी असलेले चार्जेस – डेबिट कार्ड हरवले तर नवीन कार्ड इश्यू करण्यासाठी बँकाकडून ५० ते ५०० रुपये आकारले जातात.

एसएमएस चार्जेस – तुमच्या अकाऊंटवर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची माहिती देण्यासाठी बँकांकडून एसएमएस पाठवले जातात. हे एसएमएस फ्री नसतात. त्यासाठी पैसे आकारले जातात. ऍक्सिस बँकेकडून आधी दर महिन्याला ५ रुपये आकारत असे. आता त्यांनी हा नियम बदलून प्रत्येक एसएमएससाठी २५ पैसे दर ठरवला आहे. महिन्याला २५ रुपयांची मर्यादा या एसएमएससाठी घालून दिलेली आहे. हे चार्जेस १ जुलै पासून लागू होतील.

चेक – १ लाखापेक्षा अधिक रकमेच्या चेकचे स्पीड क्लिअरिंग करायचे असल्यास त्यासाठी १५० रुपयांपर्यंत फी आकारली जाते. १ लाखापर्यंतच्या चेकसाठी अशी कोणतीही फी नाही. चेक बाउन्स झाल्यास बँकेकडून १००-१५० रुपये दंड आकारला जातो.

Comments are closed.