सोन्याच्या किंमतीत मोठी घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती

Gold prices across various cities in India

भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट होताना दिसत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पॉट प्राईस कमी होत आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारपेेठेवर होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुनचे गोल्ड कॉन्ट्रक्ट ०.३४ टक्केने घसरुन ४८,३७७ रुपये प्रति १० ग्रॅम वर तर जुलैचे सिल्वर फ्युचर ०.७६ टक्केंनी घसरुन ७१,७५८ वर ट्रेंड करत आहे.

जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्याच्या किंमती (Gold price today)-
देशाची राजधानी दिल्ली शहरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ३५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रँम अर्थात १ तोळ्यासाठी ४६ हजारांवर पोहचला आहे तर २४ कॅरेट सोने प्रती तोळा ४७ हजारांवर पोहचले आहे. सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या टॅक्समुळे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रती १० ग्रॅमला भाव ४६,००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार १६० रुपये प्रती १० ग्रॅम आहे.

महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात २२ कॅरेट सोन्याचा प्रती १० ग्रॅमला भाव ४६,००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार रुपये प्रती १० ग्रॅम आहे.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरात २२ कॅरेट सोन्याचा प्रती १० ग्रॅमला भाव ४६,००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार १६० रुपये प्रती १० ग्रॅम आहे.

तामिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नई शहरात २२ कॅरेट सोन्याचा प्रती १० ग्रॅमला भाव ४५ हजार ९८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार १६० रुपये प्रती १० ग्रॅम आहे.

उत्तर प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात २२ कॅरेट सोन्याचा प्रती १० ग्रॅमला भाव ४६ हजार ९३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार ८३० रुपये प्रती १० ग्रॅम आहे.

 

Comments are closed.