आनंदची बातमी – इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवली

भारतीय टॅक्सपेयर्ससाठी आनंदाची बातमी आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीची मुदत आता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ जुलै २०२१ पर्यंत होती.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT ने हा निर्णय घेतला आहे. यामुळे टॅक्सपेयर्स ला दिलासा मिळणार आहे.

डीलेड किंवा रिव्हाईज्ड रिटर्न्स भरण्याची मुदत जी ३१ डिसेंबर होती तीदेखील आता वाढवून ३१ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. मात्र या उशिरासाठी ५००० रुपये दंड भरावा लागणार आहे. याहून जास्त उशीर झाल्यास आणि मार्च ३१, २०२२ पर्यंत रिटर्न फाईल केल्यास दंडाची रक्कम वाढून १०००० रुपये होणार आहे. उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असल्यास दंडाची रक्कम १००० रुपये इतकी असणार आहे.

कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म१६ इश्यू करण्यासाठी सुद्धा एक महिना अधिकची मुदत देण्यात आली आहे. आता कंपन्या १५ जुलै २०२१ पर्यंत फॉर्म१६ इश्यू करू शकतील.

Comments are closed.