हरवलेले आधार कार्ड परत मिळवा १० स्टेप्समध्ये, तेही ऑनलाईन 

Getting AADHAR card is easier now if it is lost

तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास अथवा डॅमेज झाले असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही. नवे आधार मिळवण्यासाठीची प्रक्रिया UIDAI ने अतिशय सोपी केली असून अगदी काही क्लिकमध्येच तुम्ही नवे आधार मिळवू शकता. याबाबत UIDAI ने ट्विट करून माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, तुम्ही ओटीपी द्वारा तुमचे हरवलेले आधार कार्ड परत मिळवू शकता. हे तुम्ही UIDAI ची वेबसाईट किंवा mAadhaar हे ऍप वापरून करू शकता. तुम्ही तुमचा मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करून घेऊ शकता. यासाठी फक्त ५० रुपये फी आकारली जाईल. तुमच्याकड़े तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसेल तर दुसरा पर्यायी नंबर वापरून तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑर्डर करू शकता.

 

हरवलेले आधार कार्ड रिप्रिंट कसे कराल?
१. UIDAI च्या वेबसाईटवर लॉग इन करा.

२. या वेबसाईट वर असलेल्या, ‘ऑर्डर आधार रिप्रिंट’ या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका किंवा एनरोलमेंट आयडी टाका.

४. तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर द्यायचा नसल्यास तुमचा ईमेल आयडी टाकूनसुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

५. वेबसाईटवर दाखवला गेलेला CAPTCHA टाका. यानंतर ‘सेंड ओटीपी’ किंवा ‘सेंड टीओटीपी’ यापैकी एक पर्याय क्लिक करा.

६. हा ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल तर टिओटीपी एम आधार ऍपमध्ये येईल.
७. ओटीपी टाकून टर्म अँड कंडिशन्स स्वीकारा.

८. मेक पेमेंटवर क्लिक करून ५०  रुपये तुम्हाला हव्या त्या ऑनलाईन पद्धतीने भरा.

९. जी रिसीट जनरेट होईल ती डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा.

१०. पेमेंट झाल्यावर तुमचे आधार कार्ड प्रिंट होऊन स्पीड पोस्टामार्फत तुमच्यापर्यंत १५ दिवसांत येईल.

Comments are closed.