पैसापाणी मंथली स्टॉक- एचडीएफसी बँक

Monthly Stock Analysis Series

प्रायव्हेट बँक सेक्टरमध्ये वर्षानुवर्षे पहिल्या नंबरवर असलेल्या एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या २ महिन्यांपासून खाली पडत होता. पण त्याने आता ट्रेंड बदलत ब्रेक आऊट दिल्याचे डेली चार्ट मध्ये दिसत आहे.

तसेच आरएसआयने सुद्धा ब्रेक आऊट दिला आहे. सध्या आरएसआय हा ६० च्या जवळ आहे आणि तो अपट्रेंड ला आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात हा शेअर जोरदार मूव्ह देऊ शकतो.

सध्या हा शेअर २०, ५० आणि १०० डे मुव्हिंग ॲव्हरेजच्यासुद्धा वर ट्रेंड करत असल्याने त्यांचा पण सपोर्ट आहे. या शेअरची किंमत १५०३ असून येत्या महिन्यात हा शेअर त्याचा ५२ विकचा हाय १६४१ पण तोडू शकतो.

बँकेचा मागील तिमाही रिझल्ट सुद्धा चांगला होता. कंपनीचा रेव्हेन्यू २४,७४१ कोटी झाला आहे जो मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत २१,२३६ कोटी होता. रेव्हेन्यू मध्ये १६.४% वाढ झाली आहे. तसेच कंपनीचा प्रॉफिट सुद्धा ८,१३८ कोटी आहे जो मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ६,९२७ कोटी होता. प्रॉफिट मध्ये सुद्धा १८.२% ने वाढ झाली आहे.

Comments are closed.