१ रुपयाचे फलेरो चॉकलेट मॅप्रोला देतंय ५०% रेव्हेन्यू
फोटोमध्ये दिसणारे फलेरो चॉकलेट्स खाल्ले असतीलच. लहान मुलांबरोबरच हे चॉकलेट्स मोठयांनाही तितकेच आवडतात. बरेचजण तर आपल्याबरोबर कायम ही चॉकलेट्स बाळगतात. पाचगणीच्या प्रसिद्ध मॅप्रो फुड्सचे हे प्रॉडक्ट आहे. आता मॅप्रो फूड्स बराच मोठा ब्रँड असला तरी त्यांची सुरुवात मात्र अगदी छोट्या स्वरूपात झाली होती.
किशोर व्होरा यांनी १९५९ मध्ये घरगुती स्वरूपात स्ट्रॉबेरी जॅम बनवायला सुरुवात केली. त्यासाठी ते परिसरातील शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी विकत घेत असत. या सगळ्यात त्यांची पत्नी मदतीला होती. इन्व्हेस्टमेंट फक्त ८०० रुपये एवढी होती. सुरुवातीला ते व्होरा जॅम्स नावाने आपले प्रॉडक्ट विकत असत. हे जॅम्स चवीला चांगले असल्याने लवकरच सांगोपांगी बातमी होऊन लोकप्रिय झाले. पसारा वाढू लागला तसे व्होरा यांनी दोन मदतनीस आपल्याबरोबर घेतले.
जसा व्यवसाय वाढत गेला तशी व्होरा यांनी आपली फार्मसीमधील नोकरी सोडून दिली. फक्त स्ट्रॉबेरी जॅम न बनवता त्यांनी इतरही फळांचे जॅम बनवले. त्याच दरम्यान व्होरा यांना सरकारकडून फ्रुट प्रोसेसिंगचा परवानासुद्धा मिळा
पुढे जाऊन १९७८ मध्ये त्यांनी आपला मॅप्रो हा ब्रँड लाँच केला. कंपनीचे नाव मात्र महाबळेश्वर फूड प्रॉडक्टस असे होते. १९८३ मध्ये किशोर यांचा पुतण्या मयूर व्होरा त्यांच्या व्यवसायात साथ देऊ लागला. त्याने आयआयएम बंगलोरमधून शिक्षण घेतले होते आणि काही काळ वोल्टाजमध्ये नोकरीसुद्धा केली होती. किशोर यांनी काही वर्षे आपल्या पुतण्याला व्यवसायाची गुपिते शिकवण्यात घालवली. त्यांनतर मात्र ते या व्यवसायातून पूर्णपणे बाजूला झाले. आपल्या पुतण्यावर विश्वास ठेवत त्यांनी त्याला त्याच्या पद्धतीने व्यवसाय चालविण्याची परवानगी दिली.
व्यवसायातून बाजूला होईपर्यंत किशोर यांनी वेगवेगळे ३०० प्रॉडक्ट्स डेव्हलप केले होते. मयूरने या प्रॉडक्टसची संख्या कमी करून जे प्रॉडक्टस यशस्वी झालेत त्यावर जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. १९८८ मध्ये व्यवसायाचा विस्तार करायचा म्हणून मयूरने २००० स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये फॅक्टरी उभारली. ही तीच जागा आहे जिथे आज मॅप्रो गार्डन उभे आहे. या फॅक्टरीसाठी मॅप्रोने बँकेकडे १५ लाखांचे लोन मागितले. हे लोन मंजूर होण्यासाठी ८ महिने लागले आणि फॅक्टरी पूर्ण उभी रहायला दोन वर्षे गेली. सध्या कंपनीचे सातारा (२००६), पुणे (२०१२) आणि पंजाबमधील पठाणकोट येथे प्लॅंट्स उभारले.
Comments are closed.