तुम्ही लस शोधताय, तिकडे ओलाने निम्म्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलंसुद्धा 

Ola is conducting a special COVID vaccination drive for it's employees

एकीकडे सबंध देशात कोव्हीड लसीचा तुटवडा असताना आघाडीची कॅब कंपनी ओला कॅब्ज आपल्या पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोव्हीड लसीकरण केले आहे. याबाबत कंपनीने २६ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले आहे. ओला कॅब्जचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा एकूण १२००० हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कंपनीचे जे कर्मचारी ४५ हून आधी वयाचे आहेत त्यांचे लसीकरण एप्रिल महिन्यात पूर्ण करण्यात आले होते. मे महिन्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्यावर इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. सध्या बंगलोर शहरात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे लसीकरण उपलब्ध आहे. जशी लसीची उपलब्धता होईल तसे इतर शहरातील कर्मचाऱ्यांसाठीदेखील लसीकरण करण्यात येईल.

यासाठी कंपनीने शहरातील काही आघाडीच्या हॉस्पिटल्सबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत कंपनीच्या बंगलोरयेथील कार्यालयाच्या आवारात लसीकरण कॅम्प सुरु करण्यात आला आहे.यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलला जावे न लागत कमी वेळात लसीकरण करून घेता येत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीमध्ये आता कोव्हीडचे उपचारदेखील समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या टेस्ट करणे, औषधोपचार यासाठी ३०००० रुपयांपर्यंतचा खर्च कंपनीकडून कर्मचाऱ्यांना परत केला जातोय. याआधी झोमॅटोने आपल्या १,५०,००० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी योजना आखत असल्याचे जाहीर केले होते.

Comments are closed.