खरेदी करून घ्या – फ्रिज, वॉशिंग मशीन महागणार 

Home Appliances might see price increase soon due to rising commodity rates

जागतिक बाजारपेठेत सध्या कमोडिटी सायकल सुरु आहे. याचाच भाग म्हणून अनेक कमोडिटी जसे की स्टील, कॉपर यांच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर होऊ शकतो. भारतीय बाजारपेठेत फ्रिज, वॉशिंग मशीन सारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. या किमती साधारणपणे जुलै २०२१ च्या मध्यावर वाढू शकतात असा अंदाज आहे.

देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने या वस्तूंची विक्री बंद आहे. मात्र एकीकडे कमोडिटीजच्या किंमती मात्र वाढतच चालल्या आहेत. दरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये ह्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी किंमती वाढवल्या होत्या. या वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल लवकर उपलब्ध होत नसल्याने ही दरवाढ झाली होती. आता नेमके जेव्हा बरेच ग्राहक ह्या वस्तू घेण्याला पसंती देतात त्या उन्हाळ्यात लॉकडाऊन लागल्याने या वस्तूंच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या एका रिपोर्टनुसार गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीत गेले महिना दोन महिने घट दिसून आली आहे. मात्र कमोडिटीजच्या किमती वाढतच असल्याने अखेरीस याचा परिणाम ग्राहकांवर होणारच आहे. आणखी फारतर महिनाभर ही इंडस्ट्री तग धरू शकते. त्यानंतर मात्र दरवाढ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसेल. याचा परिणाम म्हणून एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन सारख्या गोष्टी आणखी महाग होतील.

Comments are closed.