आता येणार पेटीएमचा आयपीओ – आज होणार मिटिंग

If all goes as per the plans, company might get listed in November 2021

एकीकडे भारतीय बाजारात आयपीओजची चलती आलेली असताना आता त्यात पेटीएमचीसुद्धा भर पडली आहे. वन97 कम्युनिकेशन्स या पेटीएमच्या मूळ कंपनीचे डायरेक्टर्स या संदर्भात आज व्हर्च्युअल मिटिंग घेणार आहेत.

पेटीएम आपला ३ बिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये साधारण २१ हजार कोटींचा आयपीओ लवकरच घेऊन येत आहे. या आयपीओला मान्यता देण्यासाठी ही मिटिंग होत आहे. पेटीएमचे सध्याचे व्हॅल्यूएशन १६ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढे आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार पेटीएम यावर्षी नोव्हेंबरमध्ये आपला आयपीओ आणू शकते. यासाठी पेटीएमकडून सल्लागार बँकांचा शोध सुरू आहे. यात मॉर्गन स्टँलेला पसंती मिळू शकते असे ब्लूमबर्गने म्हटले आहे.

भारतातील यूपीआय पेमेंट्स क्षेत्रात पेटीएम आघाडीची कंपनी मानली जाते. एक मोबाईल रिचार्ज कंपनी म्हणून २०१० मध्ये सुरू झालेल्या पेटीएमने २०१४ मध्ये पेटीएम वॉलेट सुविधा लाँच केली होती. गेल्या काही वर्षांत पेटीएमने म्युच्युअल फंड, स्टॉक ट्रेडिंग,इन्श्युरन्स सारख्या सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पेटीएमने ३२८० कोटींचा महसूल नोंदवला तर त्यांचा तोटा ३०% ने घटून २९४२ कोटींवर आला. यूपीआय पेमेंट्स मार्केटमध्ये फोनपे आणि गुगल पे हे पेटीएमचे स्पर्धक आहेत. यावर्षी भारतीय बाजारात पेटीएम सोबतच झोमॅटो, पॉलिसी बाजार, नायका सारख्या स्टार्टअप्सचेही आयपीओ येणार आहेत.

Comments are closed.