रिटेल इन्व्हेस्टर्सच्या लाडक्या राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ दोन स्टॉक्सवर लावलाय पैसा 

PSU Banks will do well in near term says Rakesh Jhunjhunwala

करोनामुळे काहीशी कमकुवत झालेली भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पीएसयू सेक्टरमधील बँका मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केला. ते मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी पीएसयू सेक्टरमधील कोणत्या बँकामध्ये आपण गुंतवणूक केली आहे हेही सांगितले.

“भारताच्या अर्थव्यवस्थेत यावर्षी दोन आकडी वाढ बघायला मिळेल. पुढच्यावर्षी हाच वृद्धीदर ६ ते १० टक्क्यांच्या दरम्यान असेल.” असे मत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले. पब्लिक सेक्टरमधील बँकांना वाढत्या क्रेडिटचा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. याचा फायदा होणाऱ्या बँकांमध्ये झुनझुनवाला यांनी एसबीआय आणि कॅनरा बँक ही दोन नावे घेतली.

या दोन्ही बँकांनी मार्च २०२१ अखेरीस संपलेल्या तिमाहीत चांगले निकाल नोंदवले होते. कॅनरा बँकेने या तिमाहीत १०११ कोटींचा नफा कमावला. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला ३२५९ कोटींचा तोटा झाला होता. एसबीआयच्या निकालाने अनेकांना आश्चर्य वाटले होते. बँकेच्या नफ्यात वार्षिक ८०% वाढ झाली तसेच नेट इंटरेस्ट इन्कमदेखील वाढले. अनेक ब्रोकर्सनी एसबीआयसाठी बाय रेटिंग दिले आहे. झुनझुनवाला यांनी एसबीआय बद्दल आपले मत मांडले. एखाद्याला जर ५००० कोटींची गरज असेल तर आजमितीला तो एसबीआयमध्येच जाईल. बँक आणि बँकेच्या सबसिडीअरीज चांगली कामगिरी करत आहेत असे त्यांनी म्हटले.

Comments are closed.