कंपनी नोंदणीसाठी भारतीयांचा कल वाढला, ‘ असं ‘ आहे नेमक चित्र
India sees registration of over 16,500 new companies in September
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 16,570 नवीन कंपन्यांची नोंदणी झाली असून, अधिकृत आकडेवारीनुसार भारतात आता एकूण सक्रिय कंपन्यांची संख्या 14.14 लाखांहून अधिक झाली आहे.
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या डेटावरून 30 सप्टेंबरपर्यंत देशात एकूण 22,32,699 कंपन्यांची नोंदणी झाली होती.
त्यापैकी 7,73,070 कंपन्या बंद पडल्या होत्या, 2,298 कंपन्या ॲक्ट 2013 नुसार निष्क्रिय स्थितीत आहेत असा दावा करण्यात आला आहे, 6,944 कंपन्या लिक्विडेशन मध्ये होत्या, तर 36,110 बंद होण्याच्या स्थितीत होत्या.
मंत्रालयाच्या मंथली इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार, कॉर्पोरेट क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत 14,14,277 सक्रिय कंपन्या होत्या.
सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नवीन कंपन्यांच्या नोंदणीचे विश्लेषण करताना मंत्रालयाने म्हटले आहे की, एप्रिल 2020 मध्ये कंपन्यांची मासिक नोंदणी 3,209 होती.
सप्टेंबर 2020 मध्ये 16,641 च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये एकूण 16,570 कंपन्यांची नोंदणी झाली. मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये कंपन्यांच्या नोंदणीमध्ये (24.68 टक्के) वाढ झाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 4,016 LLP च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये देशात एकूण 4,535 LLP ची नोंदणी झाली आहे.
14,14,277 अक्टिव कंपन्यांपैकी 14,05,098 शेअर्सद्वारे मर्यादित, 8,872 गॅरेंटीद्वारे मर्यादित आणि 307 अमर्यादित कंपन्या असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
सप्टेंबरअखेर बंद झालेल्या 7,73,070 कंपन्यांपैकी 7,13,052 कंपन्यांना कंपनी ॲक्ट अंतर्गत नोटीस जारी केल्यानंतर बंद घोषित करण्यात आल्या.
Comments are closed.