योगा करा, इन्श्युरन्स प्रिमियमवर सवलत मिळवा – वाचा सविस्तर

Practising yoga may soon get you discount on your insurance premium

IRDAI ने आरोग्य विमा पॉलिसीकरिता विविध योजना अमलात आणण्याची तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून योगासारख्या पद्धती पॉलिसीधारकांना रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यात मदत करू शकतात.

याबाबत अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी, IRDAI ने फीडबॅकसाठी विमा कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वांचा ड्राफ्ट प्रसारित केला आहे. विमा कंपन्यांनी मात्र यासाठी आणखी काही वेळ मागितला आहे.

सदर मार्गदर्शक तत्त्वांनुसार,निरोगीपणाचे निकष पूर्ण करणाऱ्या आणि रिवॉर्ड पॉइंट्ससाठी पात्र असलेल्या विमाधारकास सदर योजनेतून प्रोत्साहन दिले जाईल. विमा कंपन्या पॉलिसीधारकांना सदर योजनातून रिवॉर्ड देउ शकतात.

जर विमाधारक व्यक्ती निरोगी असेल, तर कंपन्या रेनेवल प्रीमियमवर सवलत देतात. यात दर आठवड्याल जर योगाचा सराव, कॅलरी काउन्ट आणि हेल्थ हार्ट रेट यांचा समावेश असू शकतो. अशा व्यक्तींची वेलनेस प्रोग्राममध्ये नोंदणी देखील केली जाऊ शकते. सदर वेलनेस रिवॉर्ड प्रोग्राम (WRP ) पॉलिसीधारकांना विविध क्रियात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी डिझाइन केला आहे.

विमा कंपन्या BMI, रक्तातील साखरेचे निरीक्षण, कौन्सिल, पेडोमीटर आणि डॉक्टरांसोबत व्हिडिओ/टेलिकॉन्सल्टेशन यांसारखे फायदे देणारे वेअरेबल आणि हेल्थ अॅप्स वापरत आहेत.

Comments are closed.