ग्राहकांना सुवर्णसंधी! पोस्ट बँक (IPPB) आणि HDFC मध्ये ‘ ह्या ‘ गोष्टीवर झाला करार

India Post Payments Bank ties up with HDFC to offer home loans

26 ऑक्टोबर रोजी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि HDFC लिमिटेड यांनी IPPB च्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना होमलोन देण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, इंडिया पोस्ट आपल्या भारतभरातील ग्राहकांना HDFC होमलोन उपलब्ध करून देण्यासाठी 650 शाखांचे देशभरातील नेटवर्क आणि 1,36,000 बँकिंग ऍक्सेस पॉईंट्सचा लाभ घेईल. एचडीएफसी होमलोन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा या पार्टनरशिपचा उद्देश आहे.

IPPB जवळपास 1,90,000 बँकिंग सेवा पुरवठादार, पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत होमलोन देऊ करेल.

सदर करारानुसार, होमलोनसाठी क्रेडिट, टेक्निकल आणि कायदेशीर मूल्यांकन, प्रोसेस आणि दीस्त्रिब्युशन हे एचडीएफसी लिमिटेडद्वारे हाताळले जाईल तर IPPB लोन सोर्सिंगसाठी काम पाहिल.

जे.वेंकटरामू (MD आणि CEO, IPPB) म्हणाले, हाऊसिंग फायनान्स मार्केटमध्ये आमच नेटवर्क आणि HDFC चे डिजिटली एजंट बँकिंग चॅनेल वापरून ग्राहकापर्यंत पोहचण्याचे आमचे नियोजन आहे.

HDFC कोविडच्या काळात डिजिटल चॅनेलद्वारे आक्रमकपणे पुढे येत आहे. कंपनीला डिजिटल चॅनलव्दारे 88% नविन होमलोन अर्ज प्राप्त झाले. HDFC ची वेबसाइट आता सात भाषांमध्ये उपलब्ध आहे.

स्थापनेपासूनच, IPPB ने विविध ग्राहक वर्गांसाठी नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय बँकिंग उत्पादने आणि सेवा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट, आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करणे, व्हर्च्युअल डेबिट कार्ड, आधार पेमेंट सिस्टम सेवा आणि डाक पे यूपीआय ॲप यांचा समावेश आहे.

Comments are closed.