रामदेव अग्रवाल यांनी घेतल समुद्र महालमध्ये अपार्टमेंट विकत, ‘ असा ‘ झाला सौदा

Raamdeo Agrawal buys duplex apartment in Mumbai’s Samudra Mahal for Rs 46.26 crore

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ गुंतवणूकदार रामदेव अग्रवाल यांनी मुंबईतील समुद्र महल प्रकल्पात 46.29 कोटी रुपयांची डुप्लेक्स प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

अग्रवाल हे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस (MOFSL) चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रामदेव अग्रवाल, सुनीता अग्रवाल, वैभव अग्रवाल यांनी वरळी येथील समुद्र महालमधील 17वा आणि 18वा मजला 46.29 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हे युनिट 3638 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे.

प्रॉपर्टीचे मूळ विक्रेते सुरीन नरसी निचमल मुखी हे आहेत. खरेदीसाठी खरेदीदारांनी 2.39 कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरली.

23 सप्टेंबर 2021 रोजी ट्रान्स्फर कराराची नोंदणी करण्यात आली होती. स्थानिक ब्रोकरनुसार 1.27 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने लक्झरी अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली होती.

डिसेंबर 2020 मध्ये, मोतीलाल ओसवाल फॅमिली ट्रस्टने मुंबईतील 13 व्या आणि 17 व्या मजल्यावर 6,800 चौरस फूट पसरलेले दोन डुप्लेक्स अपार्टमेंट 101 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्याचा दर 1.48 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका होता.

करण इसरानी यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला समुद्र महालमधील 5व्या आणि 6व्या मजल्यावरील डुप्लेक्स 9.45 लाख रुपयांना भाड्याने दिले होते.

शगुन कपूर गोगिया आणि मधु कपूर यांच्या मालकीच्या मॅग्स फिनव्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेडने समुद्र महालमध्ये डुप्लेक्स (फ्लॅट क्रमांक 119 आणि 120) साठी 8.2 लाख रुपये प्रति महिना भाडे दिले आहे.

समुद्र महाल हे मुंबईच्या पॉश वरळी भागातील सुमारे पाच दशके जुने आलिशान, समुद्राभिमुख निवासी संकुल आहे.हे कॉम्प्लेक्स हिरे व्यापारी नीरव मोदीचे निवासस्थान म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. योगायोगाने, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि मोदी या दोघांनी वरच्या मजल्यावर डुप्लेक्स युनिट्स आपल्या ताब्यात घेतली. सदर महाल 25 मजली कॉम्प्लेक्स प्रीमियम इस्टेट आहे.

या भागातील हे एकमेव अपार्टमेंट ब्लॉक आहे,ज्यातून समुद्राचे 360 डिग्री दर्शन होते. हे फ्रीहोल्ड टायटल आहे.

जोन्स लँग लासाले इंडियाचे रितेश मेहता, म्हणाले, “ही शहरातील एक प्रतिष्ठित जागा आहे. तीन एकरांच्या संकुलात सुमारे 100 अपार्टमेंट आणि दोन बंगले आहेत. इमारतीच्या प्रत्येक पाचव्या स्तरावर एक डुप्लेक्स आहे. 3BHK युनिट्स 1,710 स्क्वेअर फूट आकाराचे आहेत आणि डुप्लेक्स सुमारे 3,420 स्क्वेअर फूट आहे.

येथील भाडे आसपासच्या इतर इमारतींच्या तुलनेत खूप जास्त आहे. 1,700 स्क्वेअर फूट अपार्टमेंटचे भाडे महिन्याला 4.5 लाख ते 4.75 लाख रुपये आहे तर डुप्लेक्सचे भाडे दरमहा 8.5 लाख ते 10 लाख रुपये आहे.

ही प्रॉपर्टी पूर्वी ग्वाल्हेरच्या राजघराण्याच्या मालकीचा राजवाडा होता.

कॉम्प्लेक्सच्या जवळच मधुली हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, जी अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आली ती बिग बुल हर्षद मेहता यांच्यामुळे.

या अपार्टमेंट ब्लॉकच्या जवळ असलेल्या इतर प्रीमियम अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ओंकार 1973, इंडियाबुल्स ब्लू, ओबेरॉय रियल्टीचे थ्री सिक्स्टी वेस्ट आणि लोढा ग्रुपचे द पार्क यांचा समावेश आहे.

Comments are closed.