ॲमेझोन पे चे भारतात तब्बल 5 कोटी युजर्स, ‘ ही ‘ गोष्ट ठरतेय फायदेशीर

Amazon Pay UPI has recently added 5 crore customers in India.

अमेझॉन पे देशभरात आपली ई-पेमेंट, क्रेडिट आणि आर्थिक सेवा यात वेगाने वाढ करत आहे. कंपनी भारतात डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये (टियर-2 आणि टियर 3 शहरात) गुंतवणूक करत आहे. कंपनी फोनपे, पेटीएम आणि गूगल पे सोबत स्पर्धा करत आहे.

अमेझॉन पे UPI चे भारतात 5 कोटी ग्राहक झाले आहेत. अमेझॉन पे द्वारे ग्राहकांना खरेदीसाठी, बिल भरण्यासाठी, ऑनलाइन पैसे भरण्यासाठी आणि पैसे पाठवण्यासाठी सेल इव्हेंट ग्रेट इंडियन फेस्टिव्हलद्वारे बक्षिसे ऑफर करत आहे. मागील वर्षभरात, अमेझॉन पे वापरणारे 75 टक्क्यांहून अधिक ग्राहक टियर 2 आणि 3 शहरांमधून आले आहेत.

महेंद्र नेरुरकर (सीईओ ॲमेझॉन पे) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही अनेक नवकल्पनांवर काम करत आहोत ज्या मुख्यतः तीन गोष्टीवरवर केंद्रित असतील. यात पेमेंट रेल अधिक सुरक्षित करणे, ते लवचिक आणि जलद कसे बनवायचे, याचा समावेश आहे. रिअल-टाइम केवायसी आणि रीअल-टाइम क्रेडिट तपासणी या अवघड गोष्टी सुलभ करून ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट सोयीस्कर बनवणे हा आमचा उद्देश असेल. तसेच बहुतांश लोकांपर्यंत प्लॅटफॉर्म पोहचवणे हा देखील आमचा उद्देश असेल.

नेरुरकर म्हणाले की, देशातील 85 टक्के लोकसंख्या अजूनही कॅश वापरते आणि केवळ 2-3 टक्के लोकांकडेच क्रेडिट कार्ड आहेत.

ॲमेझॉन पे लॅटर आपल्या क्रेडिट सर्व्हिस मध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीनुसार हे सर्वात मोठे आणि पहिलेच प्रॉडक्ट असेल जे युजर्सना EMI ऑप्शनसह पेमेंट करण्यास परवानगी देईल. ॲमेझॉन पे लॅटरला 2 मिलियन ग्राहक साइन-अप
झाले आहेत. लॉन्च झाल्यापासून एका वर्षात, प्लॅटफॉर्मवर 99.9 टक्के पेमेंट सक्सेस रेटने 10 मिलियन व्यवहार झाले.

ॲमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना ॲमेझॉनवर आणि इतर सर्वत्र खरेदी करण्यासाठी रिवॉर्ड ऑफर करते. कंपनीने सांगितले की, गेल्या नऊ महिन्यांत जारी केलेल्या 2 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचणारे ते सर्वात फास्ट को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणून उदयास आले आहे. आज VISA द्वारे सक्षम केलेला कॉन्टॅक्टलेस कार्डचा हा एकमेव सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे.

Comments are closed.