3 विदेशी कंपन्या HFCL मध्ये गुंतवणूक, खरेदी केला ‘ इतका ‘ स्टेक

Three FIIs jointly acquire 2.64 stake in HFCL

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,व्हॅनगार्ड, क्वांट म्युच्युअल फंड आणि नॉर्जेस ह्या तीन विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कंपन्यानी एकत्रितपणे टेलिकॉम गिअर HFCL लिमिटेडमध्ये 2.64 टक्के खरेदी केला आहे.

व्हॅनगार्डने चार इंटीटीद्वारे 1.86 टक्के स्टेक खरेदी केला. यात व्हॅनगार्ड इमर्जिंग मार्केट्स स्टॉक इंडेक्स फंड, व्हॅनगार्ड टोटल इंटरनॅशनल स्टॉक इंडेक्स फंड, व्हॅनगार्ड फिड्युशियरी ट्रस्ट आणि व्हॅनगार्ड एफटीएसई ऑल वर्ल्ड स्मॉल कॅप्स इंडेक्स-क्वांट ने 0.55 टक्के तर नॉर्जेजने 0.23 टक्के स्टेक विकत घेतले.

कंपनीच्या शेअरची किंमत आज मार्केटमध्ये 69.20 रुपयांवर बंद झाली.

HFCL ने नुकतेच स्टॉक एक्सचेंजला सांगितले होते की, ते प्रायव्हेट प्लेसमेंट किंवा पब्लिक इश्यूद्वारे 750 कोटी रुपये उभारणार आहे. इक्विटी शेअर्स जारी करणे, शेअर प्रेफरन्स, बॉण्ड्स, डिबेंचर, नॉन कन्व्हर्टेबल डेट इन्स्ट्रुमेंट्स यांचाही कंपनी विचार करु शकते.

Comments are closed.