गृहकर्ज आणि बॅलन्स ट्रान्स्फरच्या मागणीत प्रचंड वाढ…

India witnesses a 42% surge demand for balance transfers and 26% in home loans

मॅजीकब्रिक्स ने दिलेल्या अहवालानुसार,आतापर्यंतच्या सर्वात कमी व्याज दरासह, देशात बॅलन्स ट्रान्सफरची मागणी ४२% नी वाढली आहे आणि H१ २०२० च्या तुलनेत H१ २०२१ मध्ये होम लोन मध्ये २६% वाढ झाली आहे.

अहवालात असेही सूचित केले आहे की H१ २०२१ मध्ये लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (LAP) साठी २०% मागणी वाढली आहे.

बॅलन्स ट्रान्सफर ही अशी प्रक्रिया आहे जिथे खरेदीदार आपली मूळ रक्कम दुसऱ्या बँकेत किंवा वित्तीय संस्थेला ट्रान्सफर करतो जेणेकरून अधिक चांगला व्याज दर मिळतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दर ४% वर कायम ठेवला आहे, यामुळे अनेक बँकांना गृह कर्जासाठी ७% पेक्षा कमी व्याज दर देण्याची परवानगी मिळाली आहे.

मॅजिकब्रिक्स होम लोन्स च्या अभ्यासानुसार असेही दिसून येते की H१ २०२० मध्ये टियर -१ शहरांमध्ये एचएल प्रमाण ३६ लाख रुपये होते, तर बीटी आणि एलएपीसाठी अनुक्रमे २६ लाख आणि ३२ लाख रुपये होते. टियर-२ शहराकरीता, एचएलसाठी २६ लाख रुपये, एलएपीसाठी २३ लाख रुपये आणि बीटीसाठी १८ लाख रुपये होते.

मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले,”गृह कर्जाची वाढती मागणी भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये निवासी मालमत्तेच्या वाढत्या मागणीच्या अनुरूप आहे. रेपो दर स्थिर ठेवणे आणि मुद्रांक शुल्क दर कमी करणे यासारख्या योजनामुळे सरकार ने योग्य दिशेने पावले उचललीआहेत. एकूणच उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत, ज्यामुळे जवळजवळ ५०% कर्जदार १५ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी निवडले जातात.

मॅजिकब्रिक्स होम लोन्स कन्झ्युमर स्टडीने असेही म्हटले आहे की वर्क फ्रॉम होम आल्यानंतर, घर खरेदीदार आता मोठ्या कॉन्फिगरेशन वर घरे खरेदी किंवा अपग्रेड करण्याचा विचार करीत आहेत . हैदराबाद, पुणे, अहमदाबाद , मुंबई आणि दिल्ली ही टॉप -५ टियर -१ शहरे आहेत ज्यात गृहकर्जाची जास्तीत जास्त मागणी आहे. तसेच लखनऊ, पाटणा, इंदूर, जयपूर आणि आग्रा सारख्या टियर -२ शहरांमध्येही असाच कल नोंदवला गेला आहे.

बॅलन्स ट्रान्सफर च्या मागणीनुसार नवी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही टॉप- ५ टियर-१ शहरे होती आणि गाझियाबाद, मोहाली, नोएडा, इंदूर आणि विशाखापट्टणम ही टॉप- ५ टियर- २ शहरे होती.

एलएपीसाठी, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली आणि पुणे टियर १ शहरांमध्ये सर्वाधिक मागणी होती तर टियर २ शहरांसाठी गुडगाव, जमशेदपूर, पाटणा, फरीदाबाद आणि लखनऊ येथे मागणी होती.

Comments are closed.