पेटीएमची धास्ती घेतली ‘या’ कंपनीने, IPO आणण्याच्या प्रस्तावित तारखेत बदल
भारतीय पेमेंट फर्म MobiKwik ने आपला IPO आणण्याची योजना पुढे ढकलली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमच्या निराशाजनक पदार्पणानंतर कंपनीने असे म्हटले आहे.
भारतीय पेमेंट फर्म MobiKwik ने आपला IPO आणण्याची योजना पुढे ढकलली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमच्या निराशाजनक पदार्पणानंतर कंपनीने असे म्हटले आहे.
“ बजाज फायनान्स समर्थित MobiKwik तेव्हाच सार्वजनिक होईल जेव्हा आम्हाला वाटेल की आम्ही एक यशस्वी IPO आणणार आहोत”. कंपनीचे संस्थापक आणि CEO बिपिन प्रीत सिंग यांनी रॉयटर्सला सांगितले, त्यांच्या फर्मला IPO लॉन्च करण्यासाठी नियामक मान्यता मिळाल्यापासून IPO आणण्याकरिता ऑक्टोबरपासून एक वर्ष मिळेल.
कंपनीचा प्रतिस्पर्धी पेटीएम चे शेअर्स त्यांच्या पदार्पणानंतर या महिन्यात घसरले आणि 2,150 प्रति शेअर्सच्या इश्यू किमतीच्या 30% पेक्षा जास्त खाली गेले.याचे मुख्य कारण हे कंपनीचे मूल्यांकन आणि व्यवसाय मॉडेल हे होते.
बँकर्स आणि विश्लेषकांनुसार पेटीएमच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे भविष्यातील ऑफरवर परिणाम होइल.
Comments are closed.