तब्बल 45000 ची भरती करणार ‘ ही ‘ कंपनी, लक्ष असूद्या

Infosys to hire 45,000 freshers this year.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने 13 ऑक्टोबर रोजी सांगितले की, त्यांनी आपल्या सेवांसाठी वाढती मागणी पाहता, वर्षभरासाठी नवीन हायरिंग चा आकडा 45,000 पर्यंत वाढवला आहे.

कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या कमाईचा अहवाल दिला, जो एकूण अंदाजांच्या पुढे होता. तसेच त्यांची महसूल वाढ ही 14-16% वरून 16.5-17.5% वर गेली. तर तिमाहीसाठी कमाईचे एकूण प्रमाण मागील तिमाहीत 13.9% च्या तुलनेत 20.1% वर गेले.

इन्फोसिसचे सीओओ यू.बी प्रवीण राव म्हणाले,
“मार्केटमधील संधीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यासाठी, आम्ही आमच्या महाविद्यालयीन पदवीधरांच्या हायरींगचा कार्यक्रम वर्षासाठी 45,000 इतका वाढवत आहोत.

ते म्हणाले,”आम्ही आरोग्य, पुनर्विकास कार्यक्रम, योग्य भरपाई आणि करिअर वाढीच्या संधीं यांचा विचार करतो”.

भारतात कंपनीच्या 86% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना लसीकरणचा किमान एक डोस मिळाला आहे, आता कंपनी हायब्रिड वर्क मॉडेल स्वीकारण्याची तयारी करत आहे.

ते म्हणाले, “आम्ही कर्मचार्‍यांना प्रॉडक्टिविटी, सायबर सेक्युरीटी, कनेक्टेड आणि वर्क लाईफ संतुलन राखण्यासाठी आवश्यक संसाधने पुरवतो.

Comments are closed.