सणासुदीत महिंद्रा ग्राहकांना देतेय भारी ऑफर, वाचा काय आहे ऑफर
Mahindra Finance has announced special festive offers on vehicle loans. The campaign labelled as ‘Shubh Utsav’ has been launched with immediate effect and will continue till the end of November 2021.
देशातील आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसने 13 ऑक्टोबर रोजी ‘शुभ उत्सव’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. वाहन कर्जबाबतीत ही ऑफर उपलब्ध असेल.
महिंद्रा फायनान्सने एका निवेदनात म्हटले आहे,सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाहनांच्या कर्जावर अत्यंत स्पर्धात्मक दरांवर ऑफर आणि सवलत देण्याचा आमचा हेतू आहे.
‘ शुभ उत्सव ‘ ही ऑफर लगेच सुरू करण्यात येणार आहे आणि पुढील दोन महिन्यांत, नोव्हेंबर अखेरीपर्यंत ती चालू राहील, “असे त्यांनी म्हटले आहे. सदर ऑफर्स संपूर्ण भारतात उपलब्ध असतील.
ह्या मोहिमेद्वारे ग्राहकांना मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत, एसयूव्ही लोन (महिंद्रा ब्रँड) 7.35 टक्के व्याज दराने,100 टक्के पर्यंत निधी,कर्जाचा कालावधी 7 वर्षांपर्यंत, प्रक्रिया शुल्कावर 50 टक्के माफी ह्या सुविधा उपलब्ध असतील.
वरील ऑफर व्यतिरिक्त, कंपनी “आता खरेदी करा आणि 60 दिवसांनी पैसे द्या” ही योजना आणि “कार आणि ट्रॅक्टर कर्जासाठी निवडक ग्राहकांसाठी त्रैमासिक आणि अर्धवार्षिक ईएमआय” देखील ऑफर करत आहे.
महिंद्रा फायनान्सच्या म्हणण्यानुसार, एनबीएफसी सध्या अर्थव्यवस्थेच्या सुरवातीसह बदलत आहे.
Comments are closed.