ITC चा Q2 रिझल्ट जाहीर! वाचा कुठं नफा तर कुठ झाला तोटा

ITC Q2 result profit comes in at 3697 crore

FMCG, हॉटेल्स, पॅकेजिंग, पेपर बोर्ड आणि स्पेशॅलिटी पेपर्स यासारख्या व्यवसायांमध्ये अग्रेसर असलेली भारतातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक कंपनी ITC लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीसाठी आज त्यांचे निकाल जाहीर केले.

कंपनीने या तिमाहीत 3,697.18 कोटी PAT कमावला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 3,232 कोटी होता. जून तिमाहीत कंपनीचा PAT 3,013 कोटी होता.

या तिमाहीत स्टँडअलोन महसूल 13,553.52 कोटी रुपयांवर आला, जो सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत 11,976 कोटी रुपये होता. Q1FY22 मध्ये महसूल 12,959 कोटी रुपये होता.

कंपनीला सिगारेट व्यवसायात चांगली मागणी, सुधारित FMCG विक्री आणि हॉटेल व्यवसायात वाढ झाल्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढला.

कंपनीचा स्टॉक 26 ऑक्टोबर रोजी 236.70 रुपयांवर बंद झाला, जो कालच्या तुलनेत 3.3 रुपयांनी (1.41 टक्के) वाढला. गेल्या एका वर्षात स्टॉकने 40 टक्के रिटर्न दिला, तर ह्या आर्थिक वर्षात तो 13 टक्के होता. गेल्या तीन महिन्यांत रिटर्न 12 टक्के आणि गेल्या एका महिन्यात स्टॉक फ्लॅट राहिला आहे.

Comments are closed.