‘ ह्या ‘ कंपन्यांच्या IPO ला सेबीकडून हिरवा कंदिल – वाचा सविस्तर

SEBI approves paytm IPO and 6 others

सेबीने गेल्या आठवड्यात सात IPO ना मंजूरी दिली आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे IPO?

पेटीएम,पॉलिसीबाझार, ESAF स्मॉल फायनान्स बँक, आनंद राठी वेल्थ, टार्सन्स प्रॉडक्ट्स, सॅफायर फूड्स आणि एचपी अॅडेसिव्ह्स या IPO ना सेबीने मंजुरी दिली आहे.

पॉलिसीबझार सुमारे 6,018 कोटी उभारण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये 3,750 कोटींचा फ्रेश इश्यूचा समावेश असेल. स्टेकहोल्डर आणि प्रवर्तकांकडून 2,267.50 कोटींच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश असेल.

आनंद राठी वेल्थलाही सेबीकडून 1,000 कोटींच्या प्रस्तावित IPO साठी मंजुरी मिळाली आहे. IPO मध्ये प्रवर्तक आणि इतर स्टेकहोल्डरद्वारे 12 मिलियन इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

टार्सन्स प्रॉडक्ट्स ही लाइफ सायन्सेस कंपनी IPO द्वारे सुमारे 1,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. ऑफरच्या आकारात 150 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि विद्यमान स्टेकहोल्डरकडून आणि प्रवर्तकांकडून 13.2 मिलियन इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये 800 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि सध्याच्या प्रवर्तक आणि स्टेकहोल्डरद्वारे 197.78 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर आहे.

सॅफायर फूड्स इंडियाच्या IPO मध्ये विद्यमान स्टेकहोल्डर आणि प्रवर्तकांच्या 17.57 मिलियन शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

16 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात, सेबीने सहा कंपन्यांच्या ऑफर मंजूर केल्या. यात अदानी विल्मर, नायका, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी, पेन्ना सिमेंट, लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स आणि सिगाची इंडस्ट्रीज यांचा समावेश होता.

Comments are closed.