कॅशलेस हेल्थ इंश्युरन्सचा क्लेम करायचाय? ह्या गोष्टी एकदा जाणून घ्या 

Important things to be keep in mind for cashless health insurance claim

सध्या सर्वच हेल्थ इंश्युरन्स कंपन्या हॉस्पिटलायझेशन बिलांसाठी कॅशलेस क्लेम सेटलमेंट देतात. हे फारसे गुंतागुंतीचे नसले तरी, क्लेम सेटलमेंट सुरळीत करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा.

१. नेटवर्क हॉस्पिटल निवडा

सर्व इंश्युरन्स कंपन्या देशभरातील रुग्णालयांशी कनेक्टेड आहेत. कॅशलेस सर्व्हिसचा उपयोग करताना तुमच्या इंश्युरन्स कंपनीसोबत लिस्टिंग असलेले हॉस्पिटल शोधण्यासाठी तुम्ही तुमची पॉलिसी आणि कंपनीची वेबसाइट तपासावी. इंश्युरन्स कंपनी थेट रुग्णालयाकडे बिल सेटल करेल. विशेषतः नियोजित हॉस्पिटलायझेशनसाठी तुमच्या निवासस्थानाजवळ असलेले हॉस्पिटल निवडा. कॅशलेस सेटलमेंटचा झाली तर त्यात तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही किंवा आपल्या स्वतःच्या खिशातून कमीत कमी रक्कम खर्च करावी लागेल.

२. इंश्युरन्स कंपनीला किंवा टीपीएला कळवा
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास, आपण इंश्युरन्स कंपनीला किंवा टीपीएला आपल्या ट्रीटमेंटबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या एक आठवडा आधी हे करा. संबंधित वैद्यकीय कागदपत्रे आणि डॉक्टरांच्या शिफारसी ईमेलद्वारे TPA ला पाठवा. कॅशलेस सेटलमेंटसाठी संमतीपत्र मिळवा. हॉस्पिटलमध्ये दाखल होतेवेळी तुम्ही हे पत्र सुपूर्त करणे आवश्यक आहे. इमर्जंसीवेळी, आपण रुग्ण दाखल झाल्याच्या 24 तासांच्या आत इंश्युरन्स कंपनी किंवा TPA ला कळविणे करणे आवश्यक आहे.

३. हॉस्पिटलच्या रूम रेंट कॅपिंगबाबत जागरूक रहा
अनेक हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी रूम रेंटवर मर्यादा ठेवतात. ही मर्यादा ५००० रुपये प्रति दिवस किंवा तत्सम काहीतरी असू शकते. त्यामुळे तुम्ही जर जास्त रूम रेंट असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालात तर तुम्हाला फरकाची रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागेल. जर तुम्ही रूम रेंटवर कोणतीही मर्यादा नसलेली पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला याबाबत काळजी करण्याची काहीच गरज नाही.

४. को-पे कलमे समजून घ्या

इंश्युरन्स कंपनी उपचारादरम्यान डिस्पोजेबलसाठी पैसे देऊ शकत नाही. तसेच कोणतेही रजिस्ट्रेशन किंवा सर्व्हिस शुल्क भरू शकत नाही. यासाठी आपण पॉलिसीचे को पे कलम समजून घेतले पाहिजे. कोपे रक्कम किती आहे याची तुम्हाला माहिती असणे महत्वाचे आहे कारण ही रक्कम तुम्हाला भरावी लागणार असते.

५. सर्व आयडेंटिटी आणि पॉलिसी प्रूफ जवळ असू द्यात.

तुमच्या इंश्युरन्स कंपनीने दिलेले कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुमचे पॅन आणि आधार कार्ड सोबत ठेवा.तुम्ही जेव्हाही प्रवास करत असाल तेव्हा तुमचे इंश्युरन्स मेडिकल कार्ड तुमच्यासोबत असले पाहिजे.

Comments are closed.