‘कही खुशी कही गम’, पाहा पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती

Check out the fuel prices in your city today

सोमवार 27 सप्टेंबर रोजी देशभरात डिझेलची किंमत पुन्हा प्रति लीटर 24 ते 26 पैशांनी वाढवण्यात आली आहे. सरकारी ऑईल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 2018 नंतरच्या उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर ही गेल्या तीन आठवड्यातील किमतीत झालेली तिसरी वाढ आहे.

पेट्रोलचे दर मात्र सलग 22 व्या दिवशी स्थिर राहिले.सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) ने 24 सप्टेंबर रोजी दैनंदिन किमतीची फेरतपासणी सुरू केली होती. मुंबईत डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली,आता किंमत 96.94 रुपये झाली. पेट्रोलची किंमत स्थिर राहिली, जे 107.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

दिल्लीमध्ये किंमतींमध्ये असाच कल दिसून आला. डिझेलच्या किंमतीत 25 पैशांनी वाढ झाली, तर पेट्रोलचे दर स्थिर राहिले. येथे एक लीटर डिझेल 89.32 रुपये आणि पेट्रोल 101.19 रुपयांनी विकले जात आहे. कोलकातामध्ये डिझेलची किंमत वाढली. तेथे डिझेल 25 पैशांनी वाढून 92.42 रुपयांवर विकले गेले. येथेही पेट्रोलचे दर स्थिर राहिले. पेट्रोल 101.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्येही डिझेलच्या किंमतीत 24 पैशांची वाढ झाली. ज्यामुळे त्याचा दर 93.93 रुपये प्रति लिटर झाला. येथे पेट्रोलची किंमत 98.96 रुपये प्रति लिटर होती.

युरोप ते अमेरिकेत क्रूड इन्व्हेन्टरी कमी झाल्याने ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 77.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ऑगस्ट महिन्यातील सरासरी किंमतीच्या तुलनेत या महिन्यात सुमारे 6-7 डॉलर प्रति बॅरल वाढल्या आहेत.

मागील काही महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाच्या सरासरी किंमती प्रति बॅरल ३ डॉलरपेक्षा कमी झाल्या होत्या. अमेरिका आणि चीनच्या मिक्स इकॉनॉमिक डाटा आणि कोविडच्या वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटमुळे आशियातील हालचालींवर निर्बंध आले होते. यामुळे, 18 जुलैपासून दिल्ली मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 0.65 रुपये प्रति लीटर आणि पेट्रोलच्या किमती 1.25 रुपयांनी कमी केल्या होत्या.

दरम्यान 4 मे ते 17 जुलै दरम्यान पेट्रोलच्या दरात 11.44 रुपयांची वाढ झाली होती. या काळात डिझेलचे दर 9.14 रुपयांनी वाढले होते. या कालावधीत दरवाढीमुळे देशातील अर्ध्याहून अधिक भागात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या वर गेले होते.

Comments are closed.