पेटीएमचा आयपीओ टाळल्याने एलआयसीचा नफा, कमावले ३० हजार कोटी
एलआयसी कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही.
पेटीएम या कंपनीने नुकतेच भारतीय शेअर बाजारात पदार्पण केले. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीचा शेअर तब्बल २७% ने खाली आला. यामुळे अनेक इन्व्हेस्टर्सला नुकसान सोसावे लागले. असे असले तरी भारतातील सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एलआयसी मात्र सुखरूप राहिली. याला कारण म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी एलआयसीचे असलेले निकष. या निकषानुसार एलआयसी कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही.
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले की, एलआयसी कधीही आयपीओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा सेकंडरी मार्केटमध्ये इव्हेस्टमेन्ट करायला प्राधान्य देते. कंपनीचे लिस्टिंग कसे झाले यावरून एलआयसी आपल्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेते.
पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications गुरुवारी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून तीन ट्रेडिंग सेशनमध्ये तिचे एकूण मूल्य जवळजवळ एक तृतीयांश गमावले आहे. पेटीएमच्या शेअर्सनी लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी ट्रेडिंगच्या लोअर सर्किट गाठत 27% तोटा नोंदवला. एकवेळ शेअर 1271 रू.च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता परंतु त्यानंतर मंगळवारी प्रति शेअर 1495 रू वर आला.
एलआयसीने पेटीएममध्ये गुंतवणूक केली नसली तरीही त्याचा त्यांच्या नफ्यावर अजिबात परिणाम झालेला नाही. मार्च 2021 ला संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात एलआयसीने 37,000 कोटी नफा कमावला. तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत कंपनीने 30,000 कोटींचा नफा कमावला आहे.
Comments are closed.