मॅग्मा एचडीआयचा – “वनप्रोटेक्ट” आधुनिक वैयक्तिक अपघात विमा

भारतातील आघाडीची सर्वसाधारण विमा कंपनी मॅग्मा एचडीआयने “वनप्रोटेक्ट” नावाच्या आधुनिक वैयक्तिक अपघात विमा उत्पादनाची घोषणा केली आहे. आजच्या जीवनशैलीच्या गरजांसाठी सुसज्ज, 20 पेक्षा अधिक कस्टमायझेबल अॅड-ऑन्ससह, “वनप्रोटेक्ट” हे साहसप्रिय आणि शोध घेणाऱ्यां लोकांसाठी योग्य साथीदार आहे.

भारतात साहसी पर्यटनाचा कल वाढत असताना, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या साहसी उपक्रमांना सुट्टीसाठी पसंती दिली जात आहे. “वनप्रोटेक्ट” साहसी प्रवाशांना आत्मविश्वासाने त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी सक्षम करते, विविध उच्च जोखमीच्या उपक्रमांसाठी संरक्षण देते.

“वनप्रोटेक्ट”चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ट्रेन किंवा विमानासारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना अपघाती मृत्यूसाठी 200% विमा संरक्षण. यामुळे “वनप्रोटेक्ट” केवळ साहसी प्रवाशांसाठीच नव्हे, तर काम किंवा विश्रांतीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे.

या नवीन युगाच्या वैशिष्ट्यांशिवाय, “वनप्रोटेक्ट” अनेक महत्त्वपूर्ण अॅड-ऑन कव्हरेज देते, त्यात समाविष्ट आहे:
• उत्पन्न गमावणे: पॉलिसीच्या कालावधीत जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यानंतर काही काळ काम करण्यास असमर्थ झाले, ज्यामुळे उत्पन्न कमी झाले, तर हा कव्हर आर्थिक मदत करतो.
• कर्ज सुरक्षितता: अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या परिस्थितीत, हा कव्हर बाकी असलेल्या कर्जाची काही रक्कम भरतो.
• हाडं मोडणं: अपघातात हाडं मोडल्यास, आर्थिक सहाय्य दिलं जातं.
• जळाल्यामुळे होणारी दुखापत: अपघातात जर एखाद्याला भाजले तर, आर्थिक मदत उपलब्ध आहे.

मॅग्मा एचडीआयचे मुख्य तांत्रिक अधिकारी अमित भंडारी यांनी “वनप्रोटेक्ट”चे महत्त्व स्पष्ट केले: “अपघात कधीही होऊ शकतात, मग ते बाथरूममध्ये पडणे असो, प्रवासात फ्रॅक्चर होणे असो, ट्रेनचे अपघात असो किंवा फटाके लागणे असो. अशा परिस्थितींमध्ये “वनप्रोटेक्ट” नेहमीच फायदेशीर ठरते. बहुपयोगी रचना असलेल्या “वनप्रोटेक्ट”मध्ये 20 पेक्षा अधिक अॅड-ऑन्सचे वैयक्तिकृत पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही नियमित प्रवासी असाल, साहसी प्रेमी असाल, कर्ज व्यवस्थापन करत असाल किंवा कुटुंबाचे प्रमुख उत्पन्न देणारे असाल, “वनप्रोटेक्ट” तुमची काळजी घेते.

सणांचा हंगाम सुरु होत असताना आणि अनेक भारतीय वार्षिक सुट्ट्यांवर जाण्याच्या तयारीत असताना, योग्य वेळी योग्य संरक्षण देणारे आमचे नवीन उत्पादन सादर करण्याचा उत्तम काळ आहे. मॅग्मा एचडीआयमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विमा उपायांची निर्मिती करण्यास वचनबद्ध आहोत.”

ग्राहकांना 1, 2, किंवा 3 वर्षांच्या विमा कालावधीचे पर्याय निवडण्याची सुविधा आहे, ज्यामुळे त्यांच्या साहसी जीवनशैलीशी जुळणारी लवचिकता मिळते. “वनप्रोटेक्ट” कायमस्वरूपी आंशिक आणि पूर्ण अपंगत्व, तसेच वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि रुग्णालय खर्चासाठी कव्हर देखील प्रदान करते, ज्यामुळे प्रत्येकासाठी एक व्यापक सुरक्षा जाळे तयार होते.

Comments are closed.