अरे काय… EV वर महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळण्याची शाश्वती कमीच, नेमका काय आहे कारण?
The issuance of the Maharashtra EV subsidy is subject to availability of slots under the state's EV policy.
महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या EV धोरणानुसार, Ola S1 आणि S1 Pro स्टेट सबसिडीसाठी 25,000 रुपयांपर्यंत पात्र आहेत.
EV खरेदी करणे हे आज ट्रेंड बनत चालल आहे आणि यामध्ये राज्य आणि केंद्र स्तरावर सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सबसिडी उपलब्ध आहेत. दरम्यान आम्ही ओला S1 Pro बुक केली आहे आणि त्यातून काही माहिती मिळवली आहे.
महाराष्ट्रात EV टू व्हीलरसाठी सबसिडी
नव्याने जाहिर केलेल्या 2021 महाराष्ट्र EV धोरणानुसार, आमची S1 Pro 25,000 रुपयांपर्यंतच्या सबसिडीसाठी पात्र हवी होती, परंतु ओला ॲप केवळ 5,000 रुपये सबसिडी दाखवत होती, ज्यामध्ये काही गोंधळात टाकणारे सबटेक्स्ट होते ज्यात ‘तुमच्याकडून स्वतंत्रपणे क्लेम करावा’ असे लिहिले होते. आम्ही स्पष्टीकरणासाठी ओलाकडे तक्रार केली आणि खालील निष्कर्ष काढला.
ओलाने आम्हाला सांगितले की खरेदीदार सबसिडीची निवड करू शकतात किंवा ती निवड रद्द करू शकतात. तुम्हाला सबसिडी चा लाभ घ्यायचा आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी कंपनी तुमच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधेल. याचा अर्थ असा नाही की सबसिडीचा दावा करण्यासाठी खरेदीदारांनी वैयक्तिकरित्या सरकारशी संपर्क साधावा. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ओला तुमच्याकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करेल, जे एकदा मंजूर केल्यावर तुम्हाला सबसिडी देण्यास परवानगी मिळेल.
महाराष्ट्र EV धोरणानुसार, टू व्हीलर वाहनांना 5,000/kWh च्या सबसिडीचा हक्क आहे, ज्याची मर्यादा 10,000 रुपये आहे. S1 आणि S1 Pro ला अनुक्रमे 2.98kWh आणि 3.97kWh बॅटरी मिळत असल्याने त्या दोन्हीही जास्तीत जास्त 10,000 रुपयांची सबसिडी मिळवण्यास पात्र आहेत.
अर्ली बर्ड इन्संटिव
या व्यतिरिक्त, पॉलिसी 31 डिसेंबर 2021 पूर्वी खरेदी केलेल्या ईव्हीसाठी एकूण सबसिडी रकमेपेक्षा 5000/kWh चे अर्ली बर्ड इन्संटिव देते. तुम्हाला एकूण 25,000 रुपयांची सूट मिळू शकते. या व्यतिरिक्त, एक स्क्रॅपेज पॉलिसी देखील आहे जी आपल्या जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीच्या बदल्यात 7,000 रुपये देते.
ओला ने सांगीतले की ॲपमध्ये नमूद केलेली ५,००० रुपये सबसिडी रक्कम ही केवळ एक सूचक रक्कम आहे आणि डिलिव्हरीच्या तारखे वेळेस संपर्क साधल्यावर ग्राहकांना नेमकी रक्कम उघड केली जाईल.
तुम्हाला ही संपूर्ण सबसिडी किंवा खरंच यातून काही मिळेल याची शाश्वती नाही. याचे मुख्य कारण हे आहे की सबसिडी डॉक्युमेंट मध्ये असे म्हटले आहे की ते केवळ पहिल्या 1,00,000 इलेक्ट्रिक दुचाकींना इन्संटिव करेल.
Comments are closed.