नोकरी शोधताय? तर ओलाकड लक्ष्य असूद्या, लवकरच करणार हायरींग

Ola Cars plans to hire 10,000 people to fuel expansion

पुढच्या वर्षात ओला कार ह्या आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक चालना देण्यासाठी, ओलाने 10,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आखली आहे.

ओला कारचे सीईओ अरुण सिरदेशमुख यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ही नियुक्ती विक्री आणि सेवा केंद्रांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात केली जाईल.

कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी पहिल्या पूर्ण महिन्याच्या कार्यात 5,000 कार विकल्या आहेत. ओला कारने दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबादसारख्या शहरांमध्ये प्री-ओन्डेड वाहनांची विक्री सुरू केली आहे आणि या आठवड्याच्या अखेरीस चंदीगड, जयपूर, कोलकाता आणि इंदूरमध्ये विस्तार करण्याची योजना आहे.

पुढील दोन महिन्यांत, प्लॅटफॉर्म 30 शहरांमध्ये कार्यान्वित करण्याचे आणि पुढील वर्षापर्यंत 100 शहरांमध्ये विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचे 2 अब्ज डॉलर कमवायचे लक्ष्य आहे.

ओला कार ग्राहकांना ओला ॲपद्वारे नवीन आणि पूर्व मालकीची (जुनी) दोन्ही वाहने खरेदी करण्याची परवानगी देते. कंपनीच्या सेवांमध्ये खरेदी, वाहन वित्त, विमा नोंदणी, ॲक्सेसरी यांचा समावेश आहे.

कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांना टेलीमॅटिक्सद्वारे अधिक चांगला अनुभव देण्यासाठी ते देशभरात सेवा केंद्रांची स्थापना करत आहेत. यात AI आणि व्हिजन-आधारित सिस्टीम चा समावेश असेल.

23 सप्टेंबर रोजी ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी भविष्यासाठी OEM प्लॅटफॉर्म खुले करण्याची योजना सांगितली होती .

हा प्लॅटफॉर्म ओलाच्या मोठ्या नवीन मोबिलिटी व्हिजनचा भाग असेल, ज्यात नवीन मोबिलिटी सर्व्हिसेस, न्यू एनर्जी व्हेईकल्स आणि न्यू ऑटो रिटेल यांचा समावेश आहे.

Comments are closed.