अंबानी कायम नफ्यातच! रिलाइन्सचा Q2 रिझल्ट जाहीर

RIL Q2 Result: Profit jumps 46% to Rs 15,479 crore

रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर 2021मध्ये चालू तिमाहीत 15479 कोटी रुपयांच्या एकत्रित नफ्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा नफा 10,602 कोटी रुपयांच्या होता. दरम्यान जून 2021 तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न 13,806 कोटी रुपये होते.

ह्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल 1.74 लाख कोटी रुपयांवर आला, जो वर्षभरापूर्वी मिळालेल्या 1,16,195 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त आहे. मागील तिमाहीत टॉपलाइन 1,44,372 कोटी रुपये होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सोलर एनर्जी व्यवसायात अनेक करार केल्यावर, कंपनी 1 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपपर्यंत पोहोचणारी पहिली लिस्टिंग कंपनी बनली. जुलैच्या सुरुवातीपासून हा शेअर 24 टक्क्यांनी वाढला आणि कंपनीचे मार्केट कॅपिटल 18.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सोलर एनर्जी विभागावर आपले लक्ष केंद्रीत केले ​​आहे. याचे मुख्य कारण म्हणजे 2030 पर्यंत भारतात 100 GW पर्यंत सोलर एनर्जी स्थापित करण्याचा विचारआहे.

रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने (RNESL) 25 मिलियन युरोसाठी 287.73 युरो प्रति शेअरच्या किंमतीने जर्मनीच्या NexWafe GmbH चे 86,887 सीरिज सी शेअर्स विकत घेतले .NexWafe मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्सचे उत्पादन करते.

रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने प्राथमिक गुंतवणूक, दुय्यम खरेदी आणि खुल्या ऑफरद्वारे स्टर्लिंग आणि विल्सन सोलरमध्ये 40 टक्के स्टेक घेण्याचा निर्णय घेतला.ज्यातून कंपनीने जागतिक स्तरावर 11GW पेक्षा जास्त सोलर प्रॉडक्ट लॉन्च केले.

Comments are closed.