जगातील १०० श्रीमंत व्यक्तींत आणखी एक भारतीय
Radhakishan Damani enters list of world's 100 richest people
भारतातील आघाडीची रिटेल चेन कंपनी डिमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांनी १९.२ बिलियन डॉलरच्या संपत्तीसह जगातील १०० श्रीमंतांच्या यादीत प्रवेश केला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत दमानी ९८ व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी ते ११७ व्या स्थानावर होते. पहिल्या १०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इतर भारतीयामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, पालोनजी मिस्त्री, शिव नादर आणि लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे.
दमाणी, हे यशस्वी गुंतवणूकदार आणि अब्जाधीश म्हणून ओळखले जातात. मुंबईत एका मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या दमानी यांनी मुंबई विद्यापीठात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र एक वर्षाने त्यांनी शिक्षण सोडून दिले. दलाल स्ट्रीटवर काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, दमानी यांनी आपला बॉल बेअरिंगचा व्यवसाय सोडला. ते शेअर बाजारातील ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले.
त्यांनी डीमार्ट सुरू करण्यासाठी २०० मध्ये स्टॉक मार्केट सोडले. यानंतर २००२ मध्ये पवईत पहिले डीमार्ट स्टोअर उभारले. डीमार्टचा वेगाने विस्तार करत त्यांनी स्टोअर्सची संख्या २०१० मध्ये २५ पर्यंत वाढवली. यानंतर कंपनीची सातत्याने वाढ होत राहिली आणि २०१७ कंपनीचा आयपीओ आणला गेला.
दमानी माध्यमांपासून दूर राहणे पसंत करतात आणि क्वचितच मुलाखती देतात. त्यांनी भारतीय अब्जाधीश राकेश झुनझुनवाला यांना त्यांचे शेअर ट्रेडिंग तंत्र शिकवले आहे. २०२० मध्ये, ते १६.५ बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह चौथे सर्वात श्रीमंत भारतीय बनले.
Comments are closed.